हातात सत्ता असताना पाय जमिनीवर ठेवायचे असतात : शरद पवार

हातात सत्ता असताना पाय जमिनीवर ठेवायचे असतात : शरद पवार

कोल्हापूर : सत्ता हातामध्ये असताना जमिनीवर पाय ठेवायचे असतात. पण सध्याच्या राज्यकर्त्यांकडून ते होताना दिसत नसल्याचं दिसून येतंय. त्यांच्याकडून विरोधकांना तुरुंगात डांबण्याची भाषा केली जातेय, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलीय. ते रविवारी कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दीक युद्ध सुरु आहे. नारायण राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिलाय. त्यावर संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती, नारायण राणे तुम्ही माझ्या नादाला लागू नका नाहीतर तुम्हाला नागडं केल्याशिवाय सोडणार नाही असा पलटवार त्यांनी केला. त्यावर शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलंय.

खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याबद्दल शरद पवार यांना विचारले. त्यावर पवार म्हणाले की, सत्तेत असल्ल्यांनी जमिनीवर पाय ठेऊन वागायचे असते. ते काही राजकीय नेत्यांचं काम नाही. काही लोकांनी टोकाला जायची भूमिका घेतली असेल तर ठीक आहे, असेही शरद पवार म्हणाले.

शिंदे -फडणवीस सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार असल्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल पवार म्हणाले की, फेब्रुवारीमध्ये शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे, त्याबद्दल मला काही माहिती नाही. आता मी मुंबईला गेल्यावर संजय राऊत यांच्याबरोबर बोलून जाणून घेईल. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केलंय का? त्याबद्दल मला आता तरी काही माहित नाही असं शरद पवार यांनी सांगितलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube