मोदींचं आवाहन एका बाजूला अन् कोल्हापुरी नाद दुसऱ्या बाजूला; जावयासाठी बनवले ‘चांदीचे जोडे’
Silver Chappal आखाती देशातील युद्ध आणि सोन्या-चांदीचे गगनाला भिडलेले दर पाहून मोदींनी नागरिकांना काटकसरीचे आवाहन केले आहे.
Father In Law Gift Kolhapuri Silver Chappal To Son In Law : कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही,” असं उगाच म्हटलं जात नाही. जेव्हा विषय हौस आणि परंपरेचा असतो, तेव्हा कोल्हापूरकर जगाच्या कोणत्याही नियमाची पर्वा करत नाहीत. आखाती देशातील युद्ध आणि सोन्या-चांदीचे गगनाला भिडलेले दर पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काटकसरीचे आवाहन केले आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी सोनं-चांदी खरेदी टाळा, असं मोदींनी म्हटलं खरं; पण कोल्हापुरात मात्र या आवाहनाला चक्क ‘चांदीचा’ कोल्हापुरी जोडा दाखवला आहे. निमित्त ठरलंय ते ‘अधिक मास’ आणि सासऱ्यांनी जावयासाठी बनवलेल्या चांदीच्या जोड्याचं.
काय पाणीपुरीत हाडूक! चवीच्या नादात महिलेने चावलं असतं ‘हाड’; पाहा व्हायरल व्हिडिओ
साडेचार लाखांची चप्पल
हिंदू धर्मातील महत्वाचा महिना असलेला अधिक मास कालपासून सुरू झाला असून, अधिक मासात जावयाला चांदीच्या वस्तू देण्याची प्रथा आहे. याच परंपरेचा मान राखण्यासाठी सांगलीतील एका संपन्न सासऱ्याने आपल्या परदेशात असलेल्या जावयासाठी साधीसुधी नव्हे, तर चक्क दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली आहे. या चपलेची किंमत तब्बल साडेचार लाख रुपये इतकी असून याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. Father In Law Gift Kolhapuri Silver Chappal To Son In Law
एका वर्षासाठी सोन्याची खरेदी थांबवली, तर देशावर काय होणार परिणाम? समजून घ्या संपूर्ण गणित
अशी झाली चपलेची निर्मिती
कोल्हापुरातील कारागीर विक्रांत माळी यांनी ही कलाकृती साकारली आहे. विक्रांत यांनी सुरुवातीला एक लेदरची मूळ कोल्हापुरी चप्पल घेतली. त्या चपलेचे प्रत्येक पार्ट तंतोतंत चांदीमध्ये ढालण्यात आले. सुमारे 8 दिवस अहोरात्र मेहनत घेऊन ही दीड किलोची चप्पल तयार झाली. यासाठी कारागिराला 22 हजार रुपये मजुरी देण्यात आली आहे.
Banana Shape : सगळी फळं गोल, मग केळंच का ‘वाकडं’?; तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरं सापडलं!
परदेशातही कोल्हापुरी बाणा
ज्या सासऱ्यांनी ही चप्पल जावयासाठी बनवून घेतली आहे ते सांगलीचे रहिवासी असून त्यांचे जावई परदेशात स्थायिक आहेत. पण, जावाई जरी सातासमुद्रापार असला तरी त्याला आपल्या मातीची आणि कोल्हापुरी संस्कृतीची आठवण राहावी, या उद्देशाने सासऱ्यांनी ही खास भेट तयार केल्याचे समोर आले आहे. सध्या या चांदीच्या चपलेचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनापेक्षा कोल्हापूरकरांच्या या ‘नादाचीच’ जास्त चर्चा रंगली आहे. यापूर्वीही कोल्हापुरी चप्पल ‘प्राडा’ वादामुळे जागतिक स्तरावर चर्चेत आली होती. आता या लाखांच्या चांदीच्या चपलेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.