Jayant Patil : कोकणातील टायगर आता एकाकी

  • Written By: Published:
Jayant Patil : कोकणातील टायगर आता एकाकी

मुंबई : विधान परिषद कोकण शिक्षक मतदारसंघात बाळाराम पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. रायगडमध्ये तटकरे आणि सह्याद्री शिक्षण संस्था, डी वाय पाटील आणि भारती विद्यापीठ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रयत शिक्षण संस्था, भाई जयंत पाटील यांची पीएनपी संस्था असताना बाळाराम पाटील यांना पराभव पत्करावा लागला.
बाळाराम पाटील यांना जसा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फटका बसला तसाच फटका त्यांना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही बसला आहे. या दोन जिल्ह्यात म्हात्रे यांना मोठ मताधिक्य मिळाल आहे.

खरंतर या दोन जिल्ह्यात ठाणे ग्रामीण आणि पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडी यांचं मोठ मतदान आहे. विशेषतः बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार भाई ठाकूर यांच्या तसेच त्यांना मानणाऱ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत. त्या ठिकाणी बाळाराम पाटील यांना मत का मिळाली नाही? हा देखील चर्चेचा विषय आहे.

गेल्या राज्यसभा आणि विधानं परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे मतं भाजपने आपल्या बाजूने वळवली. यामुळे भाजपाचा एक खासदार आणि एक आमदार निवडून आला. हा पॅटर्न महाविकास आघाडीने कोकण शिक्षक निवडणुकीत देखील राबवला का? आपली मतं भाजपाच्या पारड्यात टाकले ? हे आकडे स्पष्ट करताय.

खरतर भाई ठाकूर आणि भाई जयंत पाटील हे घनिष्ट मित्र आहेत. एव्हाना भाई जयंत पाटील यांच्या सासुरवाडीकडून भाई ठाकूर नात्यात देखील येतात. दोन्ही भाईचे कौटुंबिक संबंध देखील आहे. विधानसभा सदस्यमधून भाई जयंत पाटील निवडून येतात, या विजयात भाई ठाकूर यांचं आणि त्यांच्या आमदारांचा पूर्ण पाठिंबा असतो. अस घट्ट नातं असताना भाई ठाकूर यांनी भाजपाकडे आपली मत वळवली का? अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

वैचारिक संघर्षामध्ये सोबत असलेले दोन भाई राजकीय संघर्षात आता वेगळ्या भूमिका घेऊ लागले आहेत का? हे या निवडणुकीत दिसतय. एकूणच काय “भाई भाई न रहा” ….. अस भाई जयंत पाटील म्हणत नसतील ना.

प्रफुल्ल साळुंखे
विशेष प्रतिनिधी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube