मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता ‘या’ दिवशी येणार, आदिती तटकरेंची घोषणा
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment: महायुती सरकारने (Mahayuti) विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Majhi Ladki Bahin Yojana) योजना सुरू केली. या योजनेला राज्यभरातील महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सरकारने पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले. मात्र सप्टेंबर महिन्याना संपत आला तरी अद्याप तिसरा हप्ता जमा न झाल्याने महिलांकडून विचारणा होत होती. दरम्यान, आता तिसरा हप्ता कधी मिळणार याची तारीख समोर आली.
Rajkummar Rao: राजकुमार रावच्या ‘न्यूटन’ला 7 वर्ष पूर्ण, निर्मात्यांनी शेअर केली चित्रपटातील झलक
सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. निवडणुकीला काही दिवस बाकी असतांना ही बैठक पार पडल्यामुळं या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता कधी द्यायचा याबाबत सुध्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. येत्या 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता जमा होणार आहे.
Ajit Pawar : पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, अजित पवारांकडून तयारीचा आढावा
लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. त्यामुळे येत्या 29 सप्टेंबरला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेचा तिसरा देण्यात येणार आहे, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या (अर्जदारांच्या) खात्यावर 1500 रुपये जमा केले जातील.
तटकरे म्हणाल्या, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनेक महिलांनी अर्ज दाखल केले, त्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करण्यास विलंब झाला. त्यामुळे या योजनेचा हप्ता देण्यास उशीर झाला. मात्र, आता ही सर्व प्रक्रिया पार पडली. तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला होईल, अलं तटकरे यांनी सांगितले.
30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार महिलांना 15 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोळामुळं ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत अनेक महिलांना अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अजूनही अर्ज करू शकता.