लाडक्या बहिणींना शेवटची संधी! ‘या’ दिवसापूर्वी e-KYC करा अन्यथा… मंत्री तटकरेंचं आवाहन
Ladaki Bahin beneficiaries ना ई केवायसी करने बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र आता या ई केवायसीची मुदत काही दिवसातच संपणार आहे.
Last chance for Ladaki Bahin beneficiaries Minister Tatkare appeals to complete e-KYC before November 18, 2025 : 2024 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य सरकारने मध्यप्रदेशच्या धरतीवर राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना ई केवायसी करने बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र आता या ई केवायसीची मुदत काही दिवसातच संपणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने तात्काळ ही केवायसी करून घ्यावी लागणार आहे. अन्यथा अनुदान बंद होण्याचे देखील शक्यता आहे.
https://x.com/iAditiTatkare/status/1983205319112306742?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी 12 पर्यंतचा अल्टमेटम; अन्यथा शेतकऱ्यांसाठी थेट…
याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. तसेच 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आतापर्यंत बहुतांशी लाडकी बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र उर्वरित लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. असे मी आवाहन करते असे यावेळी तटकरे म्हणाल्या.
ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँख खात्यात ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिनाअखेरपर्यंत जमा होऊ शकतात. दिवाळी असल्याने राज्य सरकार महिनाअखेरपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसै जमा करु शकतात. याबाबत लवकरच मंत्री आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेचे काही नियम बदलल्याने आता या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर पात्र महिलांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त महिलांनी ई-केवायसी केली आहे.
