Ketan Agarwal : शॉपिंगच्या नावाखाली सियाने केतनकडून 1 कोटी घेतले अन्… नव्या खुलाशाने खळबळ

लोहगड किल्ल्यावरून केतनला कड्यावरून ढकलल्याप्रकरणी सिया गोयल आणि केतन चौधरी यांना १८ जून रोजी अटक करण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Ketan Agrawal

Ketan Agarwal Murder Case Update : पुणे केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून, सियाने होणारा नवरा केतनकडून शॉपिंगच्या नावाखाली 1 कोटी रूपये घेतले आणि ही रक्कम चेतन चौधरीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केतनच्या हत्येतील आरोपी सियाने लग्नाच्या खरेदीसाठी त्याच्याकडून १ कोटी रुपये घेतले होते. त्यानंतर तिने हे पैसे तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिले. सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचला होता, इतकेच नाही तर गुन्ह्यानंतर काही वर्षांनी लग्न करून आपल्या भविष्याचीही योजना आखली होती, जेणेकरून त्यांच्यावर कोणताही संशय येणार नाही.

पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून केतनला कड्यावरून ढकलल्याप्रकरणी सिया गोयल आणि केतन चौधरी यांना १८ जून रोजी अटक करण्यात आली आहे. या योजनेचा एक भाग म्हणून, सिया गोयलने लग्नाच्या खरेदीच्या बहाण्याने तिचा होणारा नवरा केतन अग्रवालकडून सुमारे 1 कोटी रुपये घेतले आणि नंतर ही रक्कम चेतन चौधरीला दिल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. केतनने सियाला हे पैसे लग्नाच्या तयारीसाठी दिले होते. परंतु, लग्नाच्या खरेदीसाठी पैसे वापरण्याऐवजी सियाने ती संपूर्ण रक्कम चेतन चौधरीला दिली, जेणेकरून तो त्याच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करू शकेल.

बातमी अपडेट होत आहे.. 

follow us