लाच प्रकरणात अनिल जयसिंघानी अखेर बोलला.. म्हणाला, माझ्या मुलीवरील..

Clipboard March 18, 2023 11_06 AM

Anil Jaisinghani : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याच्या प्रकरणावरून उठलेला गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाही. या प्रकरणात सत्ताधारी विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता बुक अनिल जयसिंघानी याने प्रतिक्रिया दिली आहे. अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांनी आमच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलीवरील केस बोगस आहे, असे म्हटले आहे.

जयसिंघानी म्हणाला, की माझ्या मुलीवरील केस ही बोगस आहे. मी जर आता काही बोललो काही वक्तव्य केले तर कोठडीत माझ्या मुलीला त्रास होईल. पोलीस कस्टडीतून बाहेर येऊ द्या मग खरे काय आहे ते समोर येईल.

हे वाचा : कोण आहे अनिल जयसिंघानी?

माझी तब्बेत सध्या ठीक नाही. पण, कागदपत्रे देईल तुमच्याशी बोलेन. या प्रकरणात आमच्यावर निश्चित अन्याय होत आहे, असे जयसिंघानीने सांगितले. याबाबत टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे.

‘मविआ’तील सगळेच पक्ष अनिल जयसिंघानी फिरला, त्यामुळे.. एकनाथ शिंदेंनी दिला इशारा

दरम्यान, या लाचेच्या प्रकरणामुळे राज्यात राजकारणात गदारोळ उठला आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते सरकारवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी गटातील नेतेही त्याला प्रत्युत्तर देत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनीही सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामागे कोण सूत्रधार आहे याचा शोध घेतला जाईल. त्यासाठी आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे.  जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.  

Tags

follow us