पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांच्या वक्तव्याचा नेहमीच..

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांच्या वक्तव्याचा नेहमीच..

Chandrashekhar Bawankule : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात भाजपबाबत वक्तव्य करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांत चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केला गेला आहे. मी त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले आहे. पंकजाताईंनी खरंतर भारतीय जनता पक्षाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमी विपर्यास करणे योग्य नाही.

BJP : पक्ष माझा नाही; सूचक विधान करत पंकजा मुंडेंनी वाढवलं भाजपचं टेन्शन

पंकजाताई आज महाराष्ट्रात फिरत असून जनसंपर्क अभियनात सहभागी झाल्या आहेत. मध्य प्रदेशात त्यांच्या 15 पेक्षा जास्त सभा होणार आहेत. काहीतरी मुद्दा घेऊन राज्यात संभ्रम निर्माण केला जात आहे. त्या काही बोलल्या की त्याचा विपर्यास केला जात असल्याचे बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?

तुम्ही म्हणताय ताईची पार्टी, ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पार्टी माझी होऊ शकत नाही. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला. आणखी काय होईल ? आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, असेही मुंडे म्हणाल्या.

दिल्लीतील पुतळा हटवल्यानंतर सरकारला उपरती; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube