Maharashtra Budget 2023 : महिलांसाठी सरकारने केल्या मोठ्या घोषणा; वाचा काय देणार सरकार ?

Maharashtra Budget 2023 : महिलांसाठी सरकारने केल्या मोठ्या घोषणा; वाचा काय देणार सरकार ?

Maharashtra Budget 2023 :  राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार, नोकरदार महिला, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्यात घरकाम सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. या महिलांच्या हिताचा  विचार करून त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे तयार करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Maharashtra Budget 2023 : गरिबांसाठी मोठी घोषणा, आता 5 लाखांपर्यंत महात्मा फुले योजनेत उपचार करता येणार

शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रीकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत. तसेच या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या व्यतिरिक्त अन्य काही महत्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. त्यादृष्टीने आगामी काळात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube