शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका : आता ब्राह्मणांसाठीही आर्थिक विकास महामंडळ

  • Written By: Published:
शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका : आता ब्राह्मणांसाठीही आर्थिक विकास महामंडळ

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ब्राह्मण समाजाची, परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला आज (दि.23) कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या महामंडळाच्या स्थापनेसाठी अनेक दिवसांपासून ब्राह्मण समाजाची आंदोलनं सुरू होती. या निर्णयाशिवाय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decision) अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा झाली आहे.  (Maharashtra Cabinet Meeting Decision )

मोठी बातमी! राज्यातील तब्बल 14 ITI चे नामांतर होणार, जाणून घ्या नवीन नावे

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले धडाकेबाज निर्णय कोणते?

✅ लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे करण्याचा निर्णय

✅ बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी

✅ धान उत्पादकांना दिलासा : आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

✅ कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश

✅ जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय

✅ शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प

✅ करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा

✅ यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते

✅ क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड

✅ ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद

✅ राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ

✅ मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम; राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प

✅ हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार

✅ एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार

✅ ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ

 

✅ राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ

✅ राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण

✅ छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये

✅ अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा

✅ जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी

✅ श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार

✅ दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान

✅ महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर

Oscars 2025 : किरण रावचं स्वप्न पूर्ण; ‘लापता लेडिज’ ची ऑस्करच्या स्पर्धेत भारताकडून ग्रँड एन्ट्री

कुणबी आणि राजपूत समाजासाठीही निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्याबरोबर राज्य सरकारने कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागास प्रवर्गात (OBC) समावेश करण्यास आणि राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळालही (नियोजन) कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.

रोहित पवारांना धक्का; फडणवीसांनी कर्जत-जामखेडची मजबुत फळी फोडली

विधानसभेच्या तोंडावर निर्णयांचा धडाका

आगामी काळात राज्यात विधानसभाचं बिगुल वाजणार आहे. त्याआधी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने मोठं मोठे निर्णय घेतले आहे. यात प्रामुख्याने राज्यात आरक्षणाच्या मागणीने जोर धरलेला असतानाचा याच पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाकडूनही विद्यार्थ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी करण्यात आल होती. या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली होती. अखेर या मागणीला यश आले असून, आता ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube