शेतकऱ्यांना कमाईची संधी ! सरकार एकराला देणार 50 हजार; फडणवीसांनी केली घोषणा

शेतकऱ्यांना कमाईची संधी ! सरकार एकराला देणार 50 हजार; फडणवीसांनी केली घोषणा

Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने सरकारने सोलर फीडर योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेचे काही निकष आहेत. सोलर फीडर बसविण्यासाठी जमीनीची गरज राहणार आहे. जर शेतकऱ्याने यासाठी तीस वर्षांसाठी जमीन दिली तर त्या मोबदल्यात पन्नास हजार रुपये एकरप्रमाणे पैसे सरकार देणार आहे. या रकमेत दरवर्षी तीन टक्के वाढही केली जाणार आहे.

ग्रामीण भागात शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देतात. दिवसा लाईट नसते त्यामुळे नाईलजाने त्यांना रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागते. अशा वेळी वन्यप्राण्यांचे हल्ले व अन्य दुर्घटनांची धास्ती असतेच. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सोलर फीडर योजना आणली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने अर्थसंकल्पातच ही योजना जाहीर केली होती. त्यानुसार आज बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी फीडर उभारण्यासाठी जमिनीची आवश्यकता राहणार आहे. शेतकऱ्यांनी जर यासाठी जमीन दिली तर त्याचा मोबदला सरकारकडून दिला जाणार आहे. शेतकऱ्याने जर तीस वर्षांसाठी जमीन दिली तर पन्नास हजार रुपये एकर प्रमाणे पैसे सरकार देणार आहे. तसेच दरवर्षी या रकमेत तीन टक्के वाढही केली जाणार आहे.

Cabinet Meeting : बैठकीतील महत्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात

 

सोलरकरता मोठे गुंतवणूदार तयार आहेत. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. या योजनेमुळे कमी पैशात वीज उपलब्ध होईल, असा दावा सरकारने केला आहे. साधारण तीन रुपये 30 पैशांना वीज मिळेल. यासोबतच कोळशामुळे होणारी पर्यावरणाची हानी ही होणार नाही. या पद्धतीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

Jitendra Awhad : आप्पासाहेब धर्माधिकारींचं नाव बदनाम करु नका…

साखर कारखान्यांच्या प्रस्तावाबाबत एक उपसमिती नेमण्यात आलेली आहे. जेवढी जागा आहे तेवढीच मदत मिळेल. कर्ज थकवलले आहेत त्यांना मदत मिळणार नाही असे निकष काढले जातील. ९ कारखाने महाविकास आघाडी काळात NTDC कडे गेले होते. त्यांनी ते पुन्हा सरकारकडे पाठवले आहेत.

फडणवीसांनी लावला जोर 

राज्य सरकारने अर्थसंकल्पात अनेक योजना जाहीर केल्या आहेत. शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्यासाठी अनेक योजना सुरू केल्या जाणार आहेत. सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली आहे. इतकेच नाही तर नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा मागील सरकारने केली मात्र, काहीच दिले नाही. आमच्या सरकारने मात्र साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा केला.

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सोलर फीडर योजना आणणार आहोत. आगामी चार ते पाच वर्षात सगळेच फीडर सोलरवर करण्याचे सरकारचे उद्दीष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते. राज्यात त्यांच्या अनेक ठिकाणी सभा झाल्या. त्यांनी या सभांत राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती देताना सोलर फीडर योजनेचा आवर्जुन केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube