भुजबळ-पवारांचे फडणवीसांना चिमटे; ते आलेच आहेत पण, ‘त्या’ खुर्चीत..

भुजबळ-पवारांचे फडणवीसांना चिमटे; ते आलेच आहेत पण, ‘त्या’ खुर्चीत..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भुजबळ म्हणाले, ते (देवेंद्र फडणवीस) मागच्या वेळी ज्या खुर्चीत परत येईन म्हणाले होते त्या खुर्चीत मात्र परत आलेच नाहीत.

‘ते आलेत दोन नंबरला बसलेत आता, शिंदेंना ढकलून’.. फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचे टोले

आमदार रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याची आम्हाला कोणतीही भीती नाही. याची खरी भाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटायला हवी. फडणवीस पुन्हा येईन म्हणतात पण ते कोणत्या पदावर येतील याचं उत्तर आता शिंदे यांनी द्यावं. फडणवीसांचं हे वक्तव्य आमच्यासाठी नव्हतं तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी होतं, असा टोलाही पवार यांनी लगावला.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की त्यांच्या मी पुन्हा येईनची भीती एकनाथ शिंदेंना असली पाहिजे आम्हाला नाही. ते पुन्हा येईन म्हणत आहेत म्हणजे ते आलेलेच आहेत फक्त दोन नंबरला बसलेले आहेत. मी पुन्हा येईन म्हणत आहेत म्हटल्यावर एकनाथ शिंदेंना बाजूला ढकलून ते जर आता मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर त्याची चिंता एकनाथ शिंदेंनी करायला पाहिजे. एकनाथ शिंदेंबरोबर जे चाळीस वीर गेलेले आहेत त्या सगळ्यांनी आता चिंता केली पाहिजे.

पवार म्हणाले, भाकर फिरवली पाहिजे मात्र त्यांनी निर्णय फिरवला…विखेंचा खोचक टोला

काय म्हणाले फडणवीस ?

कोल्हापुरातील चंदगड येथे फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन असं पुन्हा म्हटलं आहे. मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मी सांगतो पुन्हा येईन तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपलं कुलदैवतच नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube