Maharashtra Corona Update : दिलासादायक! राज्यात कोरोना रूग्णांमध्ये 35 टक्के घट

Maharashtra Corona Update : दिलासादायक! राज्यात कोरोना रूग्णांमध्ये 35 टक्के घट

Maharashtra Corona Update : गेले अनेक महिने देश आणि राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असताना आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहे. तर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि मास्क सक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 8 राज्यांना विशेष लक्ष ठेवण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना खबरदारीचे उपाय म्हणून कारवाई करण्याबाबतही निर्देश दिलेत.

देशभरात अद्यापही कोरोना विषाणूचा नायनाट झालेला नसून उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरियाणासह दिल्लीत कोरोनाच्या बचावासाठी ज्या उपाययोजना असतील त्या राबवण्यात याव्यात, तसेच हलगर्जीपणा करु नये, असे आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केले आहे.

खारघर दुर्घटनेची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र

मात्र आता राज्यात हळुहळू कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. रविवारी 23 एप्रिलला राज्यात 545 कोरोना रूग्णांची नोंद झाली. त्यापैकी 141 रूग्ण हे एकट्या मुंबईत होते. मात्र या रूग्णसंख्येत राज्याला दिलासा असा आहे. की, शनिवारी 22 एप्रिलला राज्यात 850 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेत रविवारी रूग्णसंख्येत 35 टक्के घट झाली आहे. कारण राज्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाण देखील कमी झालं आहे. त्यामुळे रूग्णसंख्येत 35 टक्के घट झाली आहे. या चाचण्यांमध्ये रविवारी राज्यात सुमारे 8,278 लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या. मात्र कोरोना रूग्णांमध्ये घट झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube