महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरवर अन्याय? सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधान

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरवर अन्याय? सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधान

पुणे : येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदाची मानाची गदा शिवराज राक्षे या पैलवानानं पटकावलीय. अखेरच्या सामन्यात शिवराज राक्षेनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटातच चितपट करुन महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलंय. पण दुसरीकडं सोशल मीडियावर एक वेगळ्याच चर्चांना उधान आलंय. पैलवान सिकंदर शेखवर अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियावर अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

झालं असं की, माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात सेमी फायनलचा सामना पार पडला. हा सामना अतिशय थरारक असा पाहायला मिळाला. महेंद्र गायकवाडचा विजय झाला. पण सोशल मीडियावर सिकंदरवर अन्याय झाल्याची जोरदार चर्चा रंगलीय.

सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाडने तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत एक गुण घेत आघाडी मिळवली. महेंद्रने आघाडी घेतल्यावर सिकंदरनं प्रतीडाव टाकत दोन गुण पटकावले. पहिल्या फेरीत सिकंदर शेख 2-1 गुणांनी आघाडी घेतली होती. पुढच्या फेरीत महेंद्रने 4 गुण मिळवत आघाडी घेत सिकंदवर 5-4 अशी आघाडी घेतली. पण महेंद्रनं लावलेली बाहेरील डांग हा डाव व्यवस्थीत झाला नव्हता, सिकंदर डेन्जर पोझिशनला नव्हता मग चार गुण कशाचे दिले? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाताहेत.

सिकंदर आणि महेंद्र यांच्यामध्ये एकेक गुणासाठी चढाओढ चालू असताना शेवटच्या मिनिटाला चांगली झटापाट सुरु होती. त्यात अखेरीस महेंद्र गायकवाडनं एक गुण मिळवत कुस्ती जिंकली. या निर्णयावरुन सोशल मीडियावर आक्षेप घेतला जात आहे.

एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर म्हटलंय की, सिकंदरच्या कुस्ती निर्णयात न्यायी भूमिका घेतली गेली नाही. पंचकमिटीवर काही आक्षेप घेण्यात आलेत. खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? ते गुण घाईनं जाहीर करण्याचा प्रयत्न दिनेश गुंड यांनी का केला? सिकंदरला टांग मारली पण तो पाठीवर पडला का? अथवा त्याचा एखादा खांदा तरी मैदानाला टेकला का? दोन्ही अँगलनं कुस्तीचा रिप्ले मोठ्या स्क्रीनवर का दाखवला गेला नाही?

सिकंदरच्या कोचला तात्काळ हाकलून लावत का कुस्ती सुरु केली गेली? हा व्हिडिओ प्रेक्षकांमधून आलाय. यात सर्व स्पष्ट होतंय. बाकी सिकंदर हरला हा मुद्दा नाही. त्यानं भारत जिंकलाय. फक्त न्यायदानात चूक होऊ नये आणि ती करुही नये, अशा प्रकारच्या भावना एका नेटकऱ्यानं व्यक्त केल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube