‘बाळासाहेब नसते तर भाजपाची काय औकात होती?’ शिंदे गटाचा नेता बोंडेंवर भडकला

‘बाळासाहेब नसते तर भाजपाची काय औकात होती?’ शिंदे गटाचा नेता बोंडेंवर भडकला

Sanjay Gaikwad replies Anil Bonde : देशात मोदी महाराष्ट्रात शिंदे या शिंदे गटाच्या एकाच जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. जाहिरातीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच वगळण्यात आल्याने भाजपचे नेते कमालीचे नाराज झाले. त्यानंतर चूक लक्षात येताच आज फडणवीस यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात देण्यात आली. मात्र, अजूनही जाहिरातींची चर्चा सुरूच आहे. ही जाहिरात कुणी दिली, असे प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारले जात आहेत. सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपही आमनेसामने आले आहेत. भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनीही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे हे वाघ आहेत. या 50 वाघांमुळेच भाजपाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची महाराष्ट्रात काय औकात होती? असा जळजळीत सवाल गायकवाड यांनी केला आहे.

‘नुसत्या नकला काढून मुख्यमंत्री होता येणार नाही’; आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं!

ते पुढे म्हणाले, एखाद्या मुख्यमंत्र्याचं काम जनतेला पटत असेल आणि जनता कौतुक करत असेल तर ते पचवायची ताकद राजकीय नेत्यांत असायला हवी. शिंदे राज्यात काम करत आहे. त्यांना बेडकाची उपमा देणं किंवा ते ठाण्यापुरते मर्यादित आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. आधी भाजप किती मर्यादित होता, कुणाच्या मदतीने तुम्ही राज्यात मोठे झालात याचा विचार केला पाहिजे.

काय म्हणाले होते बोंडे ?

बेडूक कितीही हवा भरली तरी तो हत्ती बनत नाही, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे हे उत्तम मुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना चुकीचे सल्ले देत असल्याचे बोंडे म्हणाले. शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय, असा हल्लाबोलही अनिल बोंडे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube