‘अजितदादा भाषणाला उभे राहताच निघून का गेलो?’ फडणवीसांनीच संशय मिटवला

‘अजितदादा भाषणाला उभे राहताच निघून का गेलो?’ फडणवीसांनीच संशय मिटवला

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज वरळी येथे आयोजित महायुतीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या इंडिया (India) आघाडीवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. मात्र, याच बैठकीत असा एक प्रसंग घडला. ज्याचं स्पष्टीकरण फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातच दिलं.

त्याचं झालं असं, मुंबईतील वरळी येथे महायुतीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्र भाषणासाठी उभे राहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कार्यक्रमातून निघून गेले. भर कार्यक्रमातून अचानक उठून गेल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या. मात्र, या चर्चांचं उत्तर फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातच देऊन टाकलं.

‘जे इंग्रजांना जमलं नाही, तिथं मोदी काय करणार?’ राहुल गांधींचा हल्लाबोल!

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणादरम्यान निघून गेल्यानंतर काही मिनिटांनी फडणवीस परत आले होते. यानंतर आपल्या भाषणात फडणवीस यांनी या प्रकाराचा खुलासा केला. मी मघाशी काही कारणांमुळे कार्यक्रमातून उठून गेलो होतो. त्याचं स्पष्टीकरण देतो. कारण अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांकडे बातम्या नसल्या की ते बातम्या तयार करतात. त्यामुळे अजित पवार बोलायला उभे राहिले आणि फडणवीस (Devendra Fadnavis) निघून गेले अशा प्रकारची बातमी तयार होऊ नये यासाठी मी आधीच स्पष्टीकरण देतो.

नेव्हीचे चीफ आले होते. संरक्षण उत्पादनासंदर्भात आम्ही त्यांच्याकडे वेळ मागितली होती. पण नेमकी साडेतीन वाजताची वेळ मिळाली. त्यामुळे मी 15 मिनिट कार्यक्रम सोडून त्यांची भेट घ्यायला गेलो आणि परत आलो, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

‘पवारांनी थांबवलं पण, ‘ममता’ थांबल्या नाहीत; फडणवीसांनी सांगितलं इंडिया बैठकीत काय घडलं?

प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणे म्हणजे काय असतं ते मुंबई महापालिकेतील  कोविड काळातील बॉडी बॅगमधील भ्रष्टाचार बाहेर आल्यावर कळलं. खरे कफनचोर कोण हे त्यावेळी लक्षात आलं. आता सगळं बाहेर येत आहे. सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा आणि मी ठरवलंय सोडणार नाही. जे लोक असे वर्तन करत असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube