पवारांनंतर पटोलेंचा वार! म्हणाले, कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारला..

पवारांनंतर पटोलेंचा वार! म्हणाले, कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारला..

Nana Patole : कर्नाटकात काँग्रेसला (Congress) मिळालेल्या यशानंतर राज्यातील महाविकास आघाडीत उत्साह संचारला आहे. राज्यातही आगामी निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव होणार असल्याचा दावा नेतेमंडळी करत आहेत. आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापुरात तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी थेट कर्नाटकातून भाजपला ललकारले.

कर्नाटकात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. जनतेने काँग्रेसला घवघवीत यश दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही मपरिवर्तन घडवेल आणि काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. बंगळुरू येथील श्री कांतिरवा मैदानात सिद्धरामय्या यांच्यासह आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी पटोले यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Karnataka : सिद्धरामय्यांच्या शपथविधीला पवारांची ‘खास’ उपस्थिती; विरोधकांच्या एकजुटीकडे ठाकरेंनी फिरविली पाठ

पटोले म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारने कर्नाटकात डबल भ्रष्टाचार केला. जनतेचा पैसा लुटला. धार्मिक मुद्द्यांच्या आधारावर मतं मागितली. महाराष्ट्रातही कटकारस्थान करून आलेले डबल इंजिनचे सरकार जनतेच्या मनातून उतरले आहे. भाजपप्रणित शिंदे सरकारचा आगामी निवडणुकीत जनताच पराभव करेल.

दरम्यान, आज सिद्धरामय्या यांच्यासह आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. राज्यातूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, अभिनेते आणि मक्कल निधी मैयामचे प्रमुख कमल हसन, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, अनेक राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि बडे नेते असेही अनेक नेते उपस्थित होते.

कर्नाटकात दाखवून दिलं, आता महाराष्ट्रातही तेच घडेल; अजितदादांनी सरकारला सुनावलं

महाराष्ट्रातही तेच घडेल – पवार 

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापुरात होते. येथे त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पवार म्हणाले, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेलं नाही. सत्ता बदलत असते कुणी कायमचं त्या खुर्चीवर नसतं. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दाखवून देईल. कर्नाटकात कसं दाखवून दिलं असे पवार म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube