‘आम्ही स्तब्ध, हात जोडतो निर्णय मागे घ्या’; प्रफुल्ल पटेलांची पवारांना भावनिक साद

‘आम्ही स्तब्ध, हात जोडतो निर्णय मागे घ्या’;  प्रफुल्ल पटेलांची पवारांना भावनिक साद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही यावेळी भावनांना वाट मोकळी करून दिली.

ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले,  पवार साहेबांच्या निर्णयाने जसे तुम्ही स्तब्ध आहात तसेच आम्ही देखील स्तब्ध झालो आहोत. मुळात त्यांनी हा निर्णय घेताना कुणाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ते जे काही आता बोलले ते योग्य नाही. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा. या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती करतो. देशाला व राज्याला पवार साहेबांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी आताच या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती पटेल यांनी केली.

पवारांकडून निवृत्ती जयंत पाटील, झिरवळ यांना अश्रू अनावर; अजितदादांकडून समजूत

दरम्यान, पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’, ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ अशा घोषणांनी यशवंतराव चव्हाण सेंटर परिसर दुमदुमून गेला आहे. यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांना अश्रू अनावर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील भावूक झालेले पहायला मिळाले आहेत. यानंतर सर्व कार्यकर्ते शरद पवारांची समजूत घालण्यासाठी व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.

Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार

पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची देखील त्यांनी घोषणा केली. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या समितीने नवा नेता निवड करावी, अशी माहिती त्यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube