सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर दानवे म्हणाले…’तारीख पे तारीख’

सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर दानवे म्हणाले…’तारीख पे तारीख’

मुंबई : न्यायालयाने सत्तासंघर्षावरील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय आज दिला. सतत सुरू असलेल्या ‘तारीख पे तारीख’ यावरुन अनिल कपूरच्या मेरी जंग या चित्रपटाची आठवण झाली. सर्व परिस्थिती समोर आहे. पक्षांतर बंदीचा कायदा आहे. आयोग काय बोलतं हे समोर आहे. निदान फेब्रुवारीच्या १४ तारखेला तरी कोर्ट निर्णय देईल, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादानंतरची संत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी थेट व्हॅलेंटाईन डे रोजीच घेण्यात येणार आहे. देशाच्या सरन्यायाधीशांनी ही सुनावणी पुढे ढकलल्याचे सांगितले.

दरम्यान पुढे बोलताना दानवे म्हणाले, सुप्रीम कोर्टात हा विषय सुरू असताना निवडणूक आयोग घाई का करतयं? वैधानिक दृष्ट्या हे सरकार वैध्य नाही. पक्षांतर कायदा ही तेच सांगतो.त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी राजीनामा देऊन खुशाल दुसऱ्या पक्षात जावं अस दानवे म्हणाले.

मंत्री मंडळाचा विस्तारही सुप्रीम कोर्टाच्या तारखेनुसारच सुरू आहे. त्यालाही तारीख पे तारीख मिळत असल्याची मिश्किल टीका दानवे यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, एका महापालिकेच्या निवडणुकीला देशाच्या पंतप्रधांनाना यावे लागते. यावरून येथील नेतृत्व महाराष्ट्रात किती मोठं आहे हे सिद्ध होतं, आणि हा शिवसेनेचा विजय आहे हे मानावं लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube