हा तर उल्लू बनवण्याचा प्रकार, 1 लाख रोजगार कसे देणार ?; भास्कर जाधवांचा सवाल
Bhaskar Jadhav on Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही बारसूचा दौरा केला. येथे त्यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंना येथे सभा घेण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे.
भाजप नेते उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजापूर येथील सोलगाव येथे जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Nitesh Rane : सर्वात मोठा दलाल आज बारसूमध्ये आलाय, राणे बंधूंची उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी
ते म्हणाले, मी इथला स्थानिक लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेच काय ते बोलतील. जर सरकारला खरोखरच रोजगार द्यायचा असेल तर 3 ते 4 लाख कोटी खर्च कोण करणार ? हे त्यांनी सांगावं. एक लाख लोकांना असा कोणता प्रकल्प जो एक लाख रोजगार देणार आहे, असा सवाल जाधव यांनी केला.
ते पुढे म्हणाले, आता यासाठी एक मंडप लावा. एका मंडपात सरकारतर्फे किंवा भाजपाच्या नेतेमंडळींन यावं त्याच स्टेजवर मी येईन आणि जनतेचे समाधान करा. हा केवळ लोकांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न आहे. आमचा एअरबर, फॉक्सकॉन प्रकल्प घेऊन या आणि हा प्रकल्प गुजरातला न्या, असा टोला जाधव यांनी लगावला. पोलिसांना जसे आदेश मिळतात त्या पद्धतीनेच ते वागतात. पोलिसांना प्रत्येक क्षेत्रात अमर्याद अधिकार दिले आहेत, असेही जाधव यांनी सांगितले.
Sharad Pawar : पक्षातील बंडाळीवर राजीनामा नाट्य, पवारांच्या राजीनामा मागे घेण्यावर शिरसाटांचा टोला
त्यांच्यावर गुन्हे दाखल करा – ठाकरे
कातळशिल्प रिफायनरीत जाऊ देणार नाही. सोलगावच्या कातळशिल्पाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी. संवर्धनासाठी मी युनोस्कोला पत्रं लिहलं होतं. हे वास्तव आहे व इथे माती परिक्षण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे पोहोचले. यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीला जे विरोध करत आहेत, त्या आंदोलकांशी संवाद साधत तेथील कातळशिल्पाची पाहणी देखील केली.