Maharashtra Politics : ‘शिंदेंची मानसिक स्थिती बिघडली, ‘वर्षा’ बंगल्यातील शस्त्रे जप्त करा’

Maharashtra Politics : ‘शिंदेंची मानसिक स्थिती बिघडली, ‘वर्षा’ बंगल्यातील शस्त्रे जप्त करा’

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय नाट्यात रोज नवीन वळणे येत आहेत. राष्ट्रवादीतील राजकीय भुकंपाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. या राजकीय गदारोळात शिवसेनेने (उबाठा) सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

या लेखात म्हटले आहे, की महाराष्ट्रात भाजपने (Maharashtra Politics) जे काही केले आहे त्यामुळे देशभरात नाचक्की झाली आहे. आता फक्त नीरव मोदी, मेहुल चोक्सी आण विजय माल्या यांनाच पक्षात सामील करून त्यांना पदे देणे बाकी राहिले आहे. या तिघांतून एकाला राष्ट्रीय कोषाध्यक्ष, दुसऱ्याला नीति आयोग आणि तिसऱ्याला रिजर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून नियुक्त करावे, असा खोचक टोला भाजपला लगावला आहे.

राष्ट्रवादीत लेटर बॉम्ब, ‘त्या’ पत्राबद्दल पवारांच्या खास माणसाने केला खळबळजनक खुलासा…

लेखात पुढे असेही म्हटले आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) आमच्याबरोबर सत्तेत सहभागी झाली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा इशारा देणारे गद्दार गटाचे प्रवक्ते आता अचानक गायब झाले आहेत. मुख्यमंत्री तर मौन झाले आहेत. गद्दार गटाचे एक मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पंधरा दिवसांपूर्वी म्हटले होते की जर बंड अपयशी ठरले असते तर शिंदेंनी आपल्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती. त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती अत्यंत खराब होती. मात्र आता अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांची मानसिक स्थिती सूरत आणि गुवाहाटीपेक्षाही जास्त खराब झाली आहे. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावरील सर्व हत्यारे तत्काळ सरकार जमा करून घ्यावीत.

अजितदादा फडणवीसांच्या बंगल्यावर 

सरकारमधील खातेवाटपासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर चर्चा होणे गरजेचे होते. मात्र अजितदादांचा गट फडणवीसांच्या बंगल्यावर पोहोचला होता. याला एक आश्चर्यच म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांची ही अवस्था अस्वाभाविक असून दिवसेंदिवस आणखी दयनीय होत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांमुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली अशी गर्जना करणारे गद्दार गटाचे एक मंत्री गुलाबराव पाटलांचे अजित पवारांच्या पायांवर लोटांगण घेणेच आता बाकी राहिले होते. राष्ट्रवादीमुळे शिवसेना सोडली आणि आता पुन्हा त्यांच्याच पायांवर लोटांगण घेणाऱ्या चेहऱ्यांना पाहून लोक हसत होते, असा टोलाही शिंदे गटाला लगावण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube