राज ठाकरेंचे महाराष्ट्रात किती आमदार-खासदार आहेत? नारायण राणेंचा खोचक सवाल
राज ठाकरेंचे महाराष्ट्रात किती आमदार-खासदार आहेत? असा खोचक सवाल करीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान, राज ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल वक्तव्य करीत टीका केली होती. त्यावर आता राणेंनी उत्तर दिलं आहे.
गौतमीच्या अदाकारीने आता महिलाही होणार घायाळ; तब्बल एवढ्या महिलांनी केले तिकीट बूक
नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात राज ठाकरेंचे किती आमदार-खासदार आहेत? अशांनी मोठ्या पक्षांवर भाष्य करावं का? आमचे देशात ३०२ खासदार आहेत. महाराष्ट्रात स्वत:चे १०५ आमदार आणि इतर १२ आहेत. आणि या एक आमदार वाल्यानं लोकप्रियतेची भाषा करावी आणि तुम्ही त्यावर चर्चा करावी? असं खोचक वक्तव्य करीत त्यांनी उत्तर दिलंय.
असंवैधानिक विधानांना काडीमात्र किंमत देत नाही, राऊतांच्या टीकेला नार्वेकरांचं प्रत्युत्तर
राज ठाकरे म्हणाले होते, महाराष्ट्रात केंद्रातल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचंच चालतं. राज्यातल्या नेत्यांना कुणी विचारात घेत नाही. मोदी शाह आहेत म्हणून त्यांचं अस्तित्व आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.
Anushka Sharmaच्या बाईक सवारीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…
दरम्यान, राज्यात सध्या कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर चांगलच राजकीय वातावरण पेटल्याचं दिसून येत आहे. राज्यातल्या विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर टीका-टिप्पणी केली जात आहे.
कर्नाटक निकालावरुन विरोधकांकडून भाजपच्या नेत्यांना टार्गेट करुन त्यांच्यावर टीकेचे सत्र सुरु आहे. त्यातच राज ठाकरेंनीही भाजपवर टीका केलीय.