केसरकरांनी दिली ऑफर पण, अजितदादांनी सांगितलं त्यामागचं खरं कारण

केसरकरांनी दिली ऑफर पण, अजितदादांनी सांगितलं त्यामागचं खरं कारण

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र तरीही शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी त्यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली होती. या ऑफरवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना केसरकर यांनी दिलेल्या ऑफरबद्दल विचारले. त्यावर पवार यांनी केसरकर यांच्या राजकारणाचा इतिहासच सांगितला.

राष्ट्रवादीसाठी संजय राऊतांची काय किंमत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना केसरकरला आमदारकीचे तिकीट देण्यात मी मोठी भूमिका बजावली होती. ते त्यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष होते.प्रविण भोसले तेथे राज्यमंत्री होते. त्यानंतर मी साहेबांना म्हटले की आता प्रविण भोसले काही निवडून येऊ शकत नाहीत त्यामुळे यावेळी आपण दीपक केसरकरांना संधी देऊ. आम्ही त्यांना संधी दिली त्यात आम्हाला यश आलं. केसरकर त्यावेळेस आमदार झाले. त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये आले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात ते तिथले पालकमंत्री झाले. त्यामुळे दोघांत खटके उडायला लागले.

केसरकर मला म्हणाले की मी काम करू शकत नाही. पक्षात असताना जर आमची कामं होत नसतील. पक्ष सत्तेत असताना कामं होत नसतील असे म्हणत नाउमेद होऊन ते शिवसेनेत गेले. तिथून ते निवडून आले. मागच्या काळात उद्धव ठाकरेंनी त्यांना राज्यमंत्री केलं. त्यानंतर शिंदेंनी बंड केलं मग ते त्यांच्याबरोबर गेले. प्रवक्ते बनले. आता त्यांना मंत्री केलं आहे. शिक्षणाची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तेव्हा पूर्वाश्रमीचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता ती आठवण त्यांना आली असेल आणि त्या आठवणीतून त्यांच्या तोंडून तसे शब्द आले असतील.

सतेज पाटलांनी केली ठाकरेंची कोंडी; ताकदीच्या आधारावर काँग्रेसने ठोकला मजबूत दावा

पटेल म्हणाले मग मी काय करू ? 

2004 मध्ये राष्ट्रवादीने जास्त जोर लावला असता तर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळालं असतं. पण, आता येणाऱ्या काळात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अजित पवार आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले याबद्दल विचारले असता अजितदादा म्हणाले मग मी काय करू त्यांनी त्यांचं मत व्यक्त केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube