Maharashtra Politics : ठाकरेंनंतर शरद पवारांना धक्का, 3 खासदार NDA च्या वाटेवर?

Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील तब्बल 6 खासदारांनी पक्षाची साथ

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील तब्बल 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. ऑपरेशन टायगरअंतर्गत या सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडत नवीन गट स्थापन केले आहे. लवकरच हा नवीन गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

या बातमीनुसार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील (NCPSP) 3 खासदार एनडीएच्या संपर्कात आहे. या तिन्ही खासदारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याशी देखील संपर्क साधला असल्याची माहिती समोर येत आहे.

शरद पवारांना धक्का, 3 खासदार एनडीएच्या वाटेवर?

सध्या राज्यातील राजकारणात सुरु असणाऱ्या चर्चेनुसार शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या पक्षातील 3 खासदार एनडीएच्या (NDA) संपर्कात आहे. आगामी काळात ही संख्या आणखी वाढू शकते मात्र सध्या संपर्कात असणारे 3 खासदार कोण आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. येणाऱ्या काही दिवसात एनडीएच्या संपर्कात असणारे तिन्ही खासदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असं देखील सांगितलं जात आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धक्का

तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली असून या खासदारांनी नवीन गट स्थापन केले आहे. लोकसभा अध्यक्षांची मंजुरी मिळाल्यानंतर हे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असं सांगितलं जात आहे.

ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही म्हणणाऱ्या ओमराजेंची शेवटची सही?; वाचा, लेट्सअप खबरबातचा खास रिपोर्ट

ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदारांमध्ये संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे.

follow us