‘बीआरएस’चे तेलंगणाचे मुख्यमंत्रीपदच धोक्यात? ; ‘त्या’ ऑफरवर भाजप नेत्यानं सुनावलंं

‘बीआरएस’चे तेलंगणाचे मुख्यमंत्रीपदच धोक्यात? ; ‘त्या’ ऑफरवर भाजप नेत्यानं सुनावलंं

Sudhir Mungantiwar : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. त्यानंतर आता भाजपात (BJP) नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीआरएसने पक्षात येण्याची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. या घडामोडींनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुनगंटीवार म्हणाले, राष्ट्रभक्त-देशभक्त मतदार तुष्टीकरणाची निती चालू देणार नाहीत. बीआरएसने पंकजा मुंडेंना दिलेली ऑफर म्हणडे खडे टाकून पाहण्याचा प्रकार आहे.

“देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे, लक्षात ठेवा…” ठाकरेंचा फडणवीसांना गर्भित इशारा

बीआरएस पक्ष महाराष्ट्रात येण्यासाठी प्रचंड घाई करत आहे. मात्र महाराष्ट्रात काय आता तेलंगणात देखील बीआरएसचा मुख्यमंत्री होणे कठीण आहे. पंकजा मुंडे या राष्ट्रभक्तीने प्रेरित राजकारण करतात. त्यामुळे त्या अशा कोणत्याही ऑफरला प्रतिसाद देणार नाहीत, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

दानवेंनीही दिली प्रतिक्रिया 

याआधी ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही प्रतिक्रिया दिली होती. पंकजा मुंडे खरेच बीआरएसमध्ये प्रवेश करतील का, किंवा त्यांच्या बीआरएसमधील प्रवेशाने या पक्षाची राज्यातील स्थिती सुधारेल का, असे प्रश्न दानवेंना विचारण्यात आले होते. त्यावर दानवे म्हणाले, पंकजा मुंडे या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्या आहेत. मी त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या आज नाही तर उद्या नेतृत्व करतील. त्या भाजपात आत्ताही नेतृत्व करत आहेत आणि आतापर्यंत नेतृत्व करत आल्या आहेत. परंतु, एखादं पद मिळालं नाही म्हणून नेतृत्व नाही असं कुणी सांगितलंय असा सवाल दानवे यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube