मुंबई-ठाण्याला झोडपले! आज ‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा; हवामान खात्याचा इशारा

मुंबई-ठाण्याला झोडपले! आज ‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा; हवामान खात्याचा इशारा

Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा जबर फटका बसला आहे. खरिप हंगामावर संकट आले आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. आज शुक्रवारी मुंबईसह, ठाणे, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात जुलै महिन्यातच पावसाने सरासरी गाठली आहे. आतापर्यंत 104 टक्के इतका पाऊस झाला आहे. 178 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान विभागाने आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, सांगली, पालघर, गोंदिया येथेही ऑरेंज अलर्ट आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे.

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला गेला आहे. कोकणात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

नांदेडात मुसळधार, मराठवाड्यात 4 टक्के जास्त पाऊस

नांदेड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नद्या ओसंडून वाहत आहेत. शेतातील शिल्लक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाहतूकही बंद झाली आहे. पावसाची सध्याची परिस्थिती पाहता शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यात सरासरीपेक्षा चार टक्के जास्त पाऊस पडला आहे.

अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी ‘भंडारदरा’ 83 टक्के भरले तर निळवंडे धरण…

विदर्भातील 9 जिल्ह्यात पावसाची सरासरी

विदर्भात अनेक ठिकाणी 1 जून ते 27 जुलैपर्यंत 495.8 मिमी पाऊस झाला आहे. या काळात 446 मिमी पावसाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, अपेक्षेपेक्षा सरासरी 11 टक्के जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये यवतमाळ 36 तर भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 25 टक्के जास्त पाऊस झाला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube