Manipur Violence : मणिपुरातील सरकार बरखास्त करा, विरोधकांशी चर्चा करा; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut on Manipur Violence : मणिपूर पेटलेलच आहे. तीन महिन्यात मणिपूर कधीच शांत झालं नाही. मणिपुरात आजही हिंसा, जाळपोळ, महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. केंद्र सरकार आणि तेथील राज्यपाल दंगली नियंत्रणात आणण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे संसदेतही मणिपूरवर चर्चा होऊ दिली जात नाही. मणिपूरवर पंतप्रधानांच्या उपस्थितीत चर्चा व्हावी त्यावर पंतप्रधानांनी उत्तर द्यावे ही आमची मागणी आहे.
जर चर्चा सुरू झाली तर सरकार कसं अपयशी आहे हे उघड होईल. या भीतीने सरकार दोन्ही सभागृहात चर्चा होऊ दिली जात नाही. माजी लष्करप्रमुखांनी मणिपूर हिंसाचारात चीनचा हात असल्याचे सांगितले होते. जर हा पाकिस्तानचा हात असता तर भाजपाच्या नेत्यांनी दिल्लीत बसून पाकिस्तानला सुका दम देण्याची स्पर्धाच सुरू केली असती. पण चीनचा हात आहे आणि चीनला दम देण्याची कोणात हिंमत नाही.
निवडणुकांसाठी आम्ही सुद्धा तयारच पण…; लांबलेल्या निवडणुकांवर फडणवीस स्पष्टच बोलले
जळतं मणिपूर सरकार थंड डोक्याने पाहतंय
आम्ही हे थोपवू शकत नाही. सरकार काय आमच्या हातात आहे का. मुळात सर्वात आधी मणिपुरातील सरकार बरखास्त केले पाहिजे. विरोधकांशी चर्चा केली पाहिजे. संसदेत चर्चा करून प्रमुख विरोधी नेत्यांची मते आजमावली पाहिजेत हाच एक मार्ग आहे. पण सरकार हे सगळं थंड डोक्याने पाहत आहे.
मणिपूर असो की हरियाणा हे सगळं सरकार प्रायोजित आहे. आता त्यांच्याकडे हाच मार्ग आहे की दंगली भडकवा आणि निवडणुकांना सामोरे जा. हरियाणात दंगलीचं काहीच कारण नव्हतं. मणिपूर प्रकरणात पंतप्रधानांनी अजूनही मौन सोडलेलं नाही. संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही. संसदेत चर्चा होऊन यावर काहीतरी मार्ग निघावा ही आमची इच्छा आहे.
Devendra Fadanvis : आळंदीतील लाठीचार्जचे व्हिडीओ एडीट केलेले; फडणवीसांचे पलटवार करत गंभीर आरोप
गुजरात दंगलीचं मॉडेल देशात लागू करण्याचा डाव
हा गुजरात मॉडेल संपूर्ण देशभरात निवडणुका जिंकण्यासाठी लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही. जेव्हापासून इंडिया आघाडी तयार झाली आहे तेव्हापासून हे घाबरले आहेत. त्यांच्याकडे आता कोणताच मुद्दा राहिला नाही. त्यामुळे आता दंगली भडकवा आणि निवडणुकांना सामोरे जा एवढेच त्यांच्या हातात राहिले आहे.