अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंचा शिंदेंना ‘जय महाराष्ट्र’, कारणही आले समोर..

अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंचा शिंदेंना ‘जय महाराष्ट्र’, कारणही आले समोर..

Sushma Andhare : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या होत्या. या घडामोडीत हाती शिवबंधन बांधत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. सभा, भाषणांतून त्या सध्या ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे विभक्त पती अॅड. वैजनाथ वाघमारे (vaijnath Waghmare) यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, ते तेथे फार काळ रमले नाहीत. वाघ यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र त्यांना कोणतीच महत्वाची जबाबदारी दिली जात नव्हती. अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण खरंच सुरुयं का? उदय सामतांनी स्पष्ट सांगितलं

वाघमारे यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचा राजीनामा अजून मंजूर करण्यात आलेला नाही. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात असल्याची माहिती आहे.

पक्ष प्रवेश करताना अॅड. वाघमारे यांनी अंधारे यांना इशारा देत विरोधात निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. लवकरच त्यांचा पर्दाफाश करणार असल्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे वाघमारे यांच्या पक्ष प्रवेशाची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती.

Akole Long March : किसान सभेच्या मोर्च्याला पोलिसांची नोटीस, आंदोलक मात्र मोर्चावर ठाम

या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. वैजनाथ वाघमारे यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. कोण कोणत्या गटात जातो यामुळे मला काही फरक पडत नाही. ज्याला त्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube