Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण खरंच सुरुयं का? उदय सामतांनी स्पष्ट सांगितलं

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण खरंच सुरुयं का? उदय सामतांनी स्पष्ट सांगितलं

Barsu Refinery Project: बारसू रिफायनरी प्रकल्पाचं सर्वेक्षण अद्याप सुरु करण्यात आलेलं नसून मातीची तपासणी सुरु असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात सध्या बारसू रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. त्यावर आता उदय सामंतांनी प्रकल्पाबाबत मोठं विधान केलंय.

Akole Long March : किसान सभेच्या मोर्च्याला पोलिसांची नोटीस, आंदोलक मात्र मोर्चावर ठाम

उदय सामंत म्हणाले, तत्कालीन सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवलं होतं. त्यानंतरच रत्नागिरीत जिल्ह्यात प्रकल्पाबाबत मोठ्या हालचाली झाल्यात. आता सध्या लोकांकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात येत असून बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांच्या बैठकी सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

एक तरी आमदार निवडून आणा; केसीआरच्या अब की बार… घोषणेवर शरद पवारांचा खोचक टोला

तसेच या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवर चर्चा झाली असून या चर्चेत काय बोलणं झालं याबाबत मला माहित नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. विरोधकांनी एकत्र येत हा प्रश्न सोडवावा, अशी आमची भूमिका आहे. त्यावर काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी विकासाच्या आड येणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यामध्ये परिपक्व राजकारण केलं जात आहे. सर्व पक्षीयांनी एकत्र आल्यानंतरच चर्चा करुन हा प्रश्न सुटणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय.

Loksabha 2024 : काँग्रेससोबत जायला तयार पण राहुल गांधी चेहरा नको; BRSची भूमिका

यावेळी बोलताना उदय सामंतांनी विरोधकांना धारेवर धरलं असून जोरदार टीकाही केली आहे. सामंत म्हणाले, या मुद्द्यावर राजकीय नेत्यांनी मतांसाठी राजकारण करु नये, असं ते म्हणाले आहेत. तसेच सर्वेक्षण नाहीतर मातीची तपासणी सुरु असून तपासणीनंतरच प्रकल्प होणार आहे की नाही? हे ठरणार असल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केलंय.

बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर राज्य सरकार सर्वपक्षीय बैठक बोलविणार आहे का? यावरही त्यांनी भाष्य केलं असून हा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube