Maharashtra Weather : मुंबई, कोकणासह ‘या’ भागात आज उष्णेतेची लाट; यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather : राज्यातील अनेक भागात गेल्याकाही दिवसांपासून वातावरणात मोठं बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस
Maharashtra Weather : राज्यातील अनेक भागात गेल्याकाही दिवसांपासून वातावरणात मोठं बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी कडक उन्हाचा तडाखा . बदलत असणाऱ्या हवामानामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आज भारतीय हवामान विभागाने मुंबई, कोकण आणि राज्यातील इतर काही भागात उष्तेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. याच बरोबर मराठवाडा आणि आसपासच्या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने (IMD Alert) दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा (Maharashtra Weather) प्रभाव अधिक राहणार आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. उष्मघाताचा (Heatwave) धोका असल्याने दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
आज चंद्र-राहूचा ‘ग्रहण योग’; मेषसह ‘या’ राशींना होणार फायदा –
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज देखील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्यानने शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्यातील इतर काही भागात उन्हाचा चटका कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.