मराठा समाज पुन्हा मुंबईला रवाना होणार, यावेळी माझी मरायचीही तयारी; जरांगेंनी दिला सरकारला इशारा

Jarange warns government मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत.

Manoj Jarange (2)

Maratha community head to Mumbai again this time, I am prepared to die Jarange warns government : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत. मराठा समाज मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात आंदोलनाची दिशा पुन्हा मुंबईकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मुंबईत जाऊन आंदोलन करण्याबाबत मराठा समाजात चर्चा सुरू असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

…म्हणून ‘तुम्बाडची मंजुळा’चा भाग होण्याची इच्छा झाली; सई ताम्हणकरने सांगितला इंटरेस्टिंग अनुभव

मुंबईतच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनासाठी मराठा समाजातील मोठ्या संख्येने लोक मुंबईकडे येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आपल्या भूमिकेबाबत बोलताना जरांगे यांनी आंदोलनासाठी आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले. ‘आता मरायचीही तयारी दाखवली आहे आणि त्यासाठी तयार आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केले.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

यावेळी देखील मराठे मुंबईलाच आंदोलन करण्याचा विचार करत आहेत. 100 टक्के मराठे हे मुंबईलाच जायचं म्हणणार आहेत. त्यामुळे आता देखील मुंबईतच आंदोलन होऊ शकतं. कारण या आंदोलनाला सुरत मार्गे हरयाणा, मध्यप्रदेश , गुजरात आणि समुद्रामार्गे गोव्यातून चहु कडून मराठा बांधव या आंदोलनाला येणार आहेत. तसेच यावेळी मी मरायची देखील तयारी ठेवली आहे. तसेच मराठे देखील या आंदोलनाच्या तयारीला लागलेले आहेत.

follow us