घरात कुणी नसल्याचं पाहून महिलेवर बलात्कार, आरोपीचं कराड गँगशी कनेक्शन
या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अजूनही आरोपी अमर बांगर याला अटक करण्यात आलेली नाही.
बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. (Beed) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडच्या सहकाऱ्याच्या मुलानं एका 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. अमर बांगर असं आरोपीचं नाव आहे, त्याच्याविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये.
महिलेच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने या 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केला आहे. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अजूनही आरोपी अमर बांगर याला अटक करण्यात आलेली नाही. घटनेबाबत अधिक तापस सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी अमर बांगर हा पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा आहे.
साहेब, मी अजून जिवंत असतानाच मृत का दाखवलं,बीडमध्ये बोगसगिरीने गाठलं टोक
समोर आलेल्या माहितीनुसार पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर हे वाल्मिक कराडचे सहकारी आहेत. किरण बांगर यांचा मुलगा अमर बांगर याने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, त्याच्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेतील आरोपीची पार्श्वभूमी ही बीडमधील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी जोडलेली असल्यामुळे या प्रकरणाची सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. आरोपी अजूनही मोकाट असून, त्याला अटक करण्यात आलेलं नाहीये.
दरम्यान वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहे. सध्या तो तुरुंगात आहे, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अटक असलेल्या आरोपींनी काही दिवसांपूर्वी तुरुंगात देखील एका कैद्याला मारहाण करत धमकावल्याची माहिती समोर आली होती, याची एक कथित ऑडिओ क्लिप देखील प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झाली होती. या मुळे देखील मोठा गोंधळ उडाला होता.