दुसरीही मुलगीच…आईने उचललं टोकाचं पाऊल

दुसरीही मुलगीच…आईने उचललं टोकाचं पाऊल

लातूर : जन्मादात्या आईनेच तीन महिन्याच्या मुलीचा गळा घोटल्याची घटना संतापजनक घटना लातूर जिल्ह्यात घडलीय. या महिलेला पहिली मुलगी होती, दुसऱ्यांदाही तिला मुलगी झाल्याने तिने तीन महिन्याच्या बाळाची गळा दाबून हत्या केलीय. या प्रकरणी निर्दयी आईविरोधात गातेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

रेखा किसन चव्हाण असं या निर्दयी आईचं नाव असून ती पती आणि एक मुलगी असा एकूण त्यांचं कुटुंब आहे. हे कुटुंब धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील होळी इथंलं आहे. मात्र, सध्या हे कुटुंब लातूर जिल्ह्यातील एका वस्तीवर वास्तव्यास आहे. त्यांना याआधी एक मुलगी झालेली होती. या पती पत्नीला दुसरा मुलगा होईल ही अपेक्षा होती. ही महिला दुसऱ्यांदा गरोदर राहिली.

दुसऱ्यांदा गरोदर राहिल्याने तिला आता मुलगा होणार अशी अपेक्षा तिने व्यक्त केलेली होती. अखेर काटगाव वसंतनगर इथल्या तांडा नजीकच्या कासार जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिने 27 डिसेंबरला गोंडस बाळाला जन्म दिला.प्रसुती झाल्यानंतर तिला समजले की, आपल्याला दुसरी देखील मुलगी झालीय, या बातमीने ती निराशेत होती. तिला काय करावं काही समजतं नव्हते. अखेर प्रसुतीच्या तिसऱ्या दिवशी तिने प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना बाळाचा गळा दाबून हत्या केलीय.

दरम्यान, या घटनेनंतर निर्दयी आई रेखा चव्हाणच्या पतीसह नातेवाईकांनाही एक प्रकारचा धक्का बसला असून दुसरीही मुलगीच झाल्याने रेखा असं कोणतं पाऊल उचलेल, यावर कोणाचाही विश्वास बसत नसल्याचं समोर आलंय.चव्हाण पती-पत्नीचं सर्व काही सुरळीत असताना रेखाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याने तिचं कुटुंब उघड्यावर पडलंय. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या निर्दयी आईला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

तिला शनिवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एकंदरीत या संपुर्ण प्रकारानंतर निर्दयी आई रेखा चव्हाणची पहिल्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी तिच्या पतीवर आली आहे. निर्दयी आईने तिच्या तीन दिवसाच्या बाळाची हत्या केली, हे वृत्त वाऱ्यासारखं पसरताच लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube