Dhananjay Munde यांनी पंकजा मुंडेंना लगावला टोला

Dhananjay Munde यांनी पंकजा मुंडेंना लगावला टोला

बीड : बंद पडलेला कारखाना जुना कारखाना भाड्यानं घेतला भाव दोन हजार दिला. इथं मात्र जवळचे कारखाने बंद पाडून नोटिसा (Notice)लागायला लागल्या, असं म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडेंचं (Pankaja Munde)नावं न घेता टोला लगावलाय. अपघातातून बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे परळीमध्ये आले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केलं. मोठ-मोठे हार, जेसीबीनं पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये धनंजय मुंडे यांचं स्वागत करण्यात आलं.

धनंजय मुंडे म्हणाले की, अपघातामध्ये काय झालं ते तुम्हाला माहीत आहे. हॉस्पिटल अणि घराचा कंटाळा आला जिवात जीव येण्याठी मी परळीत आलोय. आराम करायला आलोय. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गेलो तर एखादी बरगडी का मोडून का आला नाहीस? असं का म्हणायचे. काहीच करता येतं नाही, बोलता येत नाही, हालता येत नाही. सगळ्याला सांगितलं हे काही करू नका. बरगड्यावर भागलं, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

हा दिवस माझ्यासाठी आजचा दिवस पुनर्जन्म दिलाय, तो या मातीतल्या माणसाची सेवा करण्यासाठी. निवडणूक, मंत्रिपद स्वागत, त्यात सार्थ असतो पण फक्त आमदार असताना, भले आमदार, मंत्री नसलो तरी मी तुमच्यात असावा, हे प्रेम आहे. खरं तर मी आपल्याच परळीतील तिघांचा अपघात झाला, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

धनंजय मुंडेंना तुम्ही ताकद दिली. तुमचे आशीर्वाद आहेत. तीन वर्षात दोनदा कोविड, एका वर्षात किती संकटे यावी. तीन वर्षांच्या काळात मेंदूचा अटॅक अणि पुन्हा हा अपघात यातून सुखरूप आहे ही तुमची आशीर्वाद आहेत. कुछ लोग मेरे बारे में बोल रहे, मैने कभी पिछे से वार नही किये लढेंगे तो सामने, वक्त ने थोडासा साथ नही दिया तो लोगोने मेरी काबिलियत पर शक करना शुरु कर दिया, अशी शायरी म्हणत धनंजय मुंडे यांनी टोला लगावला.

Dhananjay Munde म्हणतात, माझा जीव तुमच्यात…

एवढी संकट आली पणं विकासाची कुठली कामे थाबू दिली नाही. जे विकासाचं स्वप्न 2019 मध्ये दाखवलं ते स्वप्न पूर्ण केलं. 70 टक्के कामं झाली. रस्ते, माझं स्वप्न एमआयडीसीचं दुप्पट उत्पन्न करण्याचं ते काम केलं. पण एक नक्की सांगतो तलाव, सगळे तलाव मंजूर आहेत. 13 तलावाने कोरडवाहू जमीन ओलिताखाली येईल. चार हजार विहिरी दिल्या. सामान्य माणसासाठी संघर्ष, जो पर्यंत आमदार असेल नसेल पण काम सुरूच राहिल, अशी ग्वाही मुंडेंनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube