Aurangabad : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पांढऱ्या सोन्याच्या दरात घट

Aurangabad : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पांढऱ्या सोन्याच्या दरात घट

औरंगाबाद : पांढरं सोनं म्हणून ओळख असणाऱ्या कापसानं यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणलंय. औरंगाबाद जिल्ह्याच्या (Aurangabad District) अनेक भागांमध्ये दोन दिवसांत कापसाचा (Cotton) दर 300 रुपयांनी घटल्यानं शेतकरी (Farmer)संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून कापसाच्या भावात सातत्यानं (Cotton Price) घसरण होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरल्याचं पाहायला मिळतंय.

कापसाला गतवर्षी प्रतिक्विंटल 13 हजारांचा विक्रमी भाव मिळाला होता. त्यामुळं शेतकऱ्यांना यंदाही कापसाला चांगला दर मिळण्याची अपेक्षा होती, शेतकऱ्यांचा अंदाज सुरुवातीपासूनच चुकल्याचं दिसून येतंय. सातत्यानं कापसाच्या दरात घट होत असल्यानं शेतकरी पुरते अडचणीत सापडलेत.

यंदा कापसाला सुरवातीलाच सात हजारांच्या आसपास दर होता. त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या आशेनं घरातच कापूस साठवून ठेवला होता. अशात काही दिवसांपूर्वी कापसाला 7 हजार 700 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याचं दिसून आलं. त्यानंतर गुरुवारी औरंगाबादच्या सोयगावच्या बाजारात या दरात वाढ होऊन 8 हजार 100 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. दोनच दिवसांत शनिवारी 300 रुपयांनी पुन्हा दरात घसरण झाल्याचं दिसून आलं.

यंदा खरिपाच्या सुरवातीलाच पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळं झालेल्या अतिवृष्टीमुळं पिकांना मोठा फटका बसलाय. त्याचाच फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याचं दिसून आलंय. शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणं पिकांची वाढ देखील झाली नाही, उत्पन्न देखील घटल्याचं दिसून आलंय. त्यामुळं यंदा बाजारात कापसाची आवक कमी झालीय. सुरुवातीला 7 हजार 700 दर मिळाल्याने तो 13 हजारापेक्षा पुढं जाण्याच्या आशेनं शेतकऱ्यांनी कापूस विकलाच नाही.

आता रब्बीचा हंगाम संपत आला तरी देखील दरात काही वाढ होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. सुरुवातीला 7 हजार 700 रुपयांचा दर मिळाल्यानं तो आणखी वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. त्यातच आता दर वाढत नसल्याचं दिसतंय. त्यामुळं आता कापसाच्या दराचं काय होणार? याबाबत शेतकरी संभ्रमात असल्याचं पाहायला मिळताहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube