Hillary Clinton आजपासून दोन दिवस औरंगाबादेत, वेरुळ लेणी, घृष्णेश्वर मंदिराला देणार भेट

Hillary Clinton आजपासून दोन दिवस औरंगाबादेत, वेरुळ लेणी, घृष्णेश्वर मंदिराला देणार भेट

औरंगाबाद : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) आजपासून (दि.7) दोन दिवसांच्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर येत आहेत. याच दौऱ्यात त्या वेरुळ लेणी (Verul Leni)व घृष्णेश्वर (Ghrushneshwar)मंदिराला भेट देणार आहेत. खुलताबाद तालुक्यात त्यांचा मुक्काम करणार आहेत. क्लिंटन यांना झेड प्लस सुरक्षा(Z Plus Security) दिल्याची माहिती राजशिष्टाचार विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण (Deputy Collector Sangeeta Chavan) यांनी दिलीय.

युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या माजी विदेशमंत्री म्हणून कार्यरत राहिलेल्या हिलरी क्लिंटन या आज 7 फेब्रुवारीला अहमदाबाद येथून खासगी विमानानं औरंगाबाद विमानतळावर येणार आहेत. तेथून ध्यान फार्मस, शहाजतपूर, ता. खुलताबाद येथे मुक्कामी राहणार आहेत. उद्या 8 फेब्रुवारीला त्या घृष्णेश्वर मंदिर व वेरूळ लेणीला भेट देणार आहेत. तर 9 फेब्रुवारीला त्या प्रस्थान करणार आहेत.

क्लिंटन यांच्यासाठी विमानतळापासून ते शहराच्या हद्दीपर्यंत शहर पोलिसांची सुरक्षा राहणार आहे. ग्रामीण-हद्दीत ग्रामीण पोलिसांची सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. ग्रामीण पोलीस दलातील 100 हून अधिक कर्मचारी व दहा ते पंधरा पोलीस अधिकारी तैनात केले आहेत. रस्ता, मुक्कामाचे ठिकाण आणि वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर आदी ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे.

हिलरी क्लिंटन यांचं आज मंगळवारी वेरूळ परिसरात आगमन होणारंय. त्या येथील एका फार्महाऊसमध्ये दोन दिवस मुक्कामी थांबणार असून, उद्या बुधवारी दिवसभर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिरास भेट देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं फार्म हाऊस व लेणी परिसरात सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube