साधी राहणी ते धडाकेबाज निर्णय; सुनिल केंद्रेकर स्वेच्छानिवृत्त का?
Sunil Kendrekar Voluntary Retirement : २०१३ साली बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी बीडमधील (Beed News) छावणी घोटाळा आणि टँकर घोटाळा उघडकीस आणला होता. यातून त्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसोबत खटके उडाले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर केंद्रेकरांच्या बदलीचा दबाव आणला होता. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडले आणि केंद्रकरांची बदली केली. पण त्यांची बदली रद्द करण्यासाठी अख्खा बीड रस्त्यावर उतरलं आणि बदली रद्द केली. त्यानंतरही केंद्रेकरांनी जनतेच्या हितासाठी ‘सिंघम’ची भूमिका निभावली. २०१३ चा किस्सा सांगण्याचे कारण म्हणजे साधी राहणी आणि धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकरांनी (Sunil Kendrekar) स्वेच्छानिवृत्ती घेतलीय. यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली.
गावांपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांच्यात नेहमी संघर्ष पाहायला मिळतो. आतापर्यंत केंद्रेकरांना अशा अनेक संघर्षाला सामोरे जावं लागंलय. पण कणखर प्रशासकीय अधिकारी अशी ख्याती असलेल्या सुनिल केंद्रेकरांनी निवृत्तीचा निर्णय का घेतला? कोणत्या राजकीय नेत्याशी त्याचे खटके उडालेत का? असे अनेक प्रश्न त्यांच्या निवृत्तीने उपस्थित झालेत.
सुनिल केंद्रेकर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. गेल्या महिन्यात सुनील केंद्रेकरांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. मात्र छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेची जबाबदारी केंद्रेकरांवर असल्याने मार्च २०२४ पर्यंत त्यांचा अर्ज स्वीकारु नये असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला होता. पण कोर्टाच्या आदेशानंतरही शिंदे-फडणवीस सरकारने त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्विकारलाय.
आगामी निवडणुकीत BRS महाराष्ट्रात धुराळा उडवणार? मतदारांनी वाढविली धाकधूक
केंद्रेकरांची प्रशासकीय कारकीर्द
राज्यातील काही मोजक्या धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत केंद्रेकरांची गनना केली जायची. त्यांनी विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त पदांवर काम केलंय आणि आता विभागीय आयुक्त पदावर निवृत्ती झालेत.
केंद्रेकरांचा साधेपणा
शेतकरी कुटुंबातून आलेल्या केंद्रेकरांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपयोजना राबवण्याचा प्रयत्न केला. साधी राहणीमान आणि लोकांत मिसळून काम करणारे अधिकारी म्हणून केंद्रेकरांना ओळखले जायंचे. काही दिवसांपूर्वी खांद्यावर पिशवी घेऊन बाजार केल्याचे त्यांच्या पत्नीसह फोटो व्हायरल झाले होते. पुण्यात कृषी आयुक्त असताना त्यांनी मला माननीय, सर वगैरे म्हणू नका, असे परिपत्रकच काढले होते. केंद्रेकरांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यतील झरी. सरकारी नोकरी असताना वेळातवेळा काढून ते शेती करण्यासाठी गावी जात होते. सोबतचं त्यांनी जंगल भ्रमंती, साप पकडणे, क्रिकेट, कार ड्रायव्हिंग असे छंदही जोपसले आहेत.
‘संभाजी भिडेंना अटक करा’; भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळांचा संताप
शेतकऱ्यांना एकरी मदत
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रेकरांनी काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे सुरु केला होता. या सर्व्हेनंतर त्यांनी खरीप आणि रब्बी या दोन हंगामाच्या सुरवातील पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी हजार रुपये एकरी मदत करण्याचा निकष काढला होता. तसा रिपोर्ट सरकारकडे पाठवला होता. मात्र त्यांच्या या भुमिकेमुळे सरकार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
बीडमधून लोकसभेची तयारी
केंद्रेकर यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर बीडमधून लोकसभा निवडणुकीला उभे राहणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. ते बीड लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. केंद्रेकर निवडणुकीला कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी निवडून येऊ शकतात, असे बीडकरांचे म्हणणे आहे. पण आपला तसा कोणताही विचार नाही. स्वेच्छानिवृत्तीमागे माझी काही खाजगी कारणं आहेत, निवडणूक आणि राजकारण याबाबत कोणताही विचार नाही, असं म्हणत केंद्रेकरांनी या चर्चांचं खंडन केलं.