दोषींवर मकोका,फेरपरीक्षेस शुल्क नसेल , पुढील वर्षीपासून परीक्षा ऑनलाईन; टीईटी पेपरफुटीप्रकरणी दादा भूसेंची माहिती

TET paper leak वर एसआयटी स्थापन केल्यानंतर आता शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी सभागृहात माहिती दिली.

TET Paper Leak

MCOCA to against guilty no fee for re-exam exams online from next year Dada Bhuse shares details regarding TET paper leak : शिक्षक पात्रता परीक्षा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला होता. (TET) टीईटीचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. यावर एसआयटी स्थापन केल्यानंतर आता शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी सभागृहात माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले शिक्षणमंत्री दादा भूसे?

टीईटी पेपरफुटीचा विषय हा प्रशासनाने त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे स्वत: कारवाईकरून हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. याप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून 4 पेक्षा अधिक पथकांच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. यामध्ये 3 आरपी अटकेत आहेत. तसेच या पेपरफुटीप्रकरणी आवश्यकता पडली तर कायद्यात काही बदल करावे लागतील का, या दृष्टिकोनातून शासनाची तयारी आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल. तसेच फेरपरीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी उमेदवारांकडून कोणतही शुल्क आकारलं जाणार नाही. तसेच पुढील वर्षीपासून परीक्षा ऑनलाईन होणार असून त्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे.

लवकरात लवकर आपलं अर्थखातं आपल्याकडे येईल; मुख्यमंत्र्यांचा शब्द अन् जय पवारांना विश्वास

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि, आज 27 जून, 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेब‌द्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली.

HSRP Number Plates नसलेल्या वाहनांवर 1 जुलैपासून कारवाई

यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या नीट परिक्षेच्या पेपरफुटीमागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे.

follow us