क्वालिटीच्या बातम्या माध्यामांना सापडत नाही म्हणून शिंदे नाराज? मुख्यमंत्र्यांनी घेतला समाचार

क्वालिटीच्या बातम्या माध्यामांना सापडत नाही म्हणून शिंदे नाराज? मुख्यमंत्र्यांनी घेतला समाचार

CM Devendra Fadnavis : गेल्याकाही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाराज असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहत नसल्याची चर्चा प्रसारमाध्यमांत सुरु आहे. मात्र आज यावर भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना टोला लावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलत होते. माध्यमांना क्वालिटीच्या बातम्या सापडत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बातम्या माध्यमात सुरु आहे. असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना लावला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आमच्या माध्यमांची आवडती बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकल्पाला स्थगिती दिली. आता ही एक पेड बातमी झाली आहे. पण हे लक्षात ठेवा की, स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही. यापूर्वी देखील मी स्पष्ट केले आहे की, जे जे राज्याच्या हिताचं आहे ते सुरु करताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी देखील होतो आणि त्यानंतर दादा देखील होते. त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहे, त्याची जबाबदारी एकट्या शिंदेंची नाही आहे तर आम्हा तिघांची आहे. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

तर ज्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी आढळल्या, खालच्या स्तरावर गडबड होत असते. त्या ठिकाणी चर्चा करुनच स्थगिती देण्यात येते पण विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तर लगेच देवेंद्र फडणवीसांचा दणका तर खाताच्या मंत्र्यानं स्वत;च्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या सुचनेनुसार स्थगिती दिली तरी देखील शिंदेंच्या खात्यात फडणवीसांनी स्थगिती दिली. अशा बातम्या माध्यमात येत आहे. पण शिंदेंना फडणवीसांचा दणका म्हणतात पण दादांचं नाव घेत नाही कारण दादा थेट अटॅक करतात ना. त्यामुळे फार कोणी त्याच्या वाटेला जात नाही. असं देवेंंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मी तुम्हा सांगतो, हे सरकार समन्वयानं चालणारं सरकार आहे. या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिथे समन्वयानं घेतो. असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना म्हणाले.

कैलास बोराडे सळई चटके प्रकरण : जरांगेंनी अर्धनग्न व्हिडिओ दाखवताच बोराडे म्हणाले, मी प्रसाद म्हणून दारू…

तसेच जर बैठकीत दोघांपैकी एक हजर नसेल तर नाराज असल्याच्या बातम्या चालतात. क्वालिटीच्या बातम्या माध्यामांना सापडत नाही आणि विरोधकांना देखील कॉलिटीची टिका करता येत नाही. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube