संपूर्ण प्रकरणाचा किस पाडणार; पार्थ पवारांनी ढापलेल्या मुंढव्यातील जमिनीवर दमानियांची धडक

Anjali Damania On Pune Land Case :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मुंढवा जमीन

  • Written By: Published:
Anjali Damania

Anjali Damania On Pune Land Case :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारामुळे चर्चेत आहे. या प्रकरणात आता राजकारण देखील चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंढव्याच्या जमिनीची पाहणी करण्यास पोहचल्या होत्या मात्र त्यांना मुंढव्याच्या जमिनीची पाहणी करण्यास मनाई करण्यात आली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणात हा व्यवहार रद्द करणारे अजित पवार कोण असा सवाल उपस्थित केला.

माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या की, परवानगी नसल्याने मुंढव्याच्या जमिनीची पाहणी करण्यास मनाई करण्यात आली. मुठे समितीचा अहवाल आज दुपारीपर्यंत सादर करण्यात येणार आहे. मी सगळ्या गोष्टींचा किस पाडणार आहे. आम्हाला या प्रकरणाची चौकशी करायची होती मात्र आम्हाला जमिनीची पाहणी करण्यास मनाई करण्यात आली. बेंज्यामिन नावाचे अधिकारी माझ्याशी उद्धट बोलले. कोंढव्यातील जमीन बोटॅनिकल गार्डनला भाड्याने दिली असं देखील अंजली दमानिया म्हणाल्या.

तर मेंढवा जमीन व्यवहार प्रकरण रद्द करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोण? भारतीय संविधानात उपमुख्यमंत्री पद नाही. अजित पवार अर्थमंत्री आहे आणि कायद्यानुसार अर्थमंत्री दुसऱ्या प्रकरणात लक्ष घालू शकत नाही. व्यवहार फक्त कायद्यानुसारच रद्द होऊ शकते मात्र दोन व्यक्तींनी घोटाळा केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कोणताही अधिकार नाही.

‘वाराणसी’ चा दमदार टीझर प्रदर्शित, प्रियंका चोप्रा महेश बाबू अन् पृथ्वीराज सुकुमारनसोबत काम करण्यास उत्साहित

सुरुवातीला 21 कोटी रुपये देऊन व्यवहार रद्द होणार असं सांगण्यात येत होते मात्र बावनकुळे म्हणातात की, आम्हाला पैसे नको आम्हाला तो व्यवहार रद्द करुन हवा. मग पुढे म्हणातात 21 नाही 42 कोटी घेऊन व्यवहार रद्द होणार मात्र कायदेशीर हा व्यवहार उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रद्द करु शकत नाही कारण व्यवहार रद्द करण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाही. व्यवहार कायद्याने रद्द होतो आणि त्यासाठी पाच कायदे आहेत असं देखील अंजली दमानिया म्हणाल्या.

follow us