Girish Mahajan : कुंभमेळ्यासाठी फेक वर्क ऑर्डर; मंत्री गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

Girish Mahajan : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्था कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरु असून हजारो कोटी

Girish Mahajan

Girish Mahajan : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्था कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरु असून हजारो कोटी रुपयांची विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता एक धक्कादायक माहितीसमोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुंभमेळ्यासाठी विविध प्रकारची कंत्राटे मिळवून देण्याची आमिष दाखवत अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली असून ऑनलाईन बनावट कागदपत्रे तयार करुन नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावानं बनावट वर्क ऑर्डर देण्यात आल्याची देखील माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा करण्याचं कंत्राट, चौरंग पुरवण्याचं काम तसेच इतर विविध कामे मिळवून देण्यासाठी संबंधितांना बनावट वर्क ऑर्डर (Fake Work Order) आणि इतर कागदपत्रे देखील देण्यात आली आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेण्यात आल्याची माहिती माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तर या प्रकरणात जामनेर, धुळे, मुंबई (Mumbai) आणि राज्यातील इतर भागांतील नागरिकांची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याची माहिती देखील गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. या प्रकरणाची तक्रार पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली असून दोषींवर कारवाई होणार असं देखील मंत्री महाजन म्हणाले. तर दुसरीकडे यामध्ये आपल्या नावाचा गैरवापर झाला नसल्याचा दावा देखील मंत्री महाजन यांनी केला आहे. तर संबंधित टोळी चार ते पाच जणांची असून ते आपण जामनेर आणि जळगावचे असल्याचे सांगतात त्यामुळे
कंत्राटदारांचा त्यावर विश्वास बसत असावा असेही माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले.

संकटमोचक आहे कोणत्या संकटात ?

तर दुसरीकडे अधिकाऱ्यांमधील असमन्वय, कुंभमेळामंत्र्यांचे दुर्लक्ष झाल्याने कुंभमेळा (Kumbh Mela 2027) नियोजन 70 ते 80 टक्के नापास झाल्याची टीका साधू – महंतांनी केली आहे. तर सोशल मीडियावर देखील यावरुन राज्य सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. फेसबुकवर एका युर्जरने लिहिले की, संकटमोचक आहे कोणत्या संकटात ?

नाशिक-त्रंबकेश्वर येथे होणाऱ्या ‘त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळ्या’ ची कामे संथगतीने होत आहेत. त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष शंकरानंद महाराज यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीवरून प्रशासनाला व मंत्र्यांना ताकीद दिली आहे. अधिकारी व कुंभमेळा मंत्र्यांच्या भरवशावर राहू नका, अन्यथा कामांमधील अयोग्य नियोजन व भ्रष्टाचारांमुळे देशभरात महाराष्ट्राची फजिती होईल. 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा आणि विकासकामांच्या संथ व निकृष्ट कारभाराबद्दल नाशिककर, तसेच साधू-महंतांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्यांची खराब अवस्था, खड्ड्यांमुळे होणारे अपघात, प्रशासनाचे नियोजनशून्य कामकाज आणि कंत्राट वाटपावरून स्थानिक नागरिकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या आढावा बैठकीला मंत्री उपस्थित असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) चे अधिकारी गैरहजर होते. मंत्री नुसता संताप करीत होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या कामांच्या नावाखाली 500 ते 600 कोटी रुपयांच्या बनावट (फेक) वर्क ऑर्डर देऊन ठेकेदारांचीळ कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला असून, यात जळगाव आणि धुळे परिसरातील काही संशयितांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

World Cup 2027 साठी वेस्ट इंडिज थेट पात्र ठरण्यात अपयशी; पुढे काय?

नाशिकच्या खड्ड्यांच्या आणि विकासकामांच्या मुद्द्यावरून महायुतीमधील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रशासनावर आणि महापालिका कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. या अंतर्गत वादामुळे महाजन यांच्या नियोजन शून्य कारभारावर बोट ठेवले जात आहे. मंत्री गिरीशभाऊ हे काय चालले आहे ? सभोवतालचा गोतावळा तपासा एकदा … अशी टीका या पोस्टद्वारे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आली आहे.

follow us