सात टर्म झाल्या कुठेतरी थांबल पहिजे… भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांचे थेट जाहीर सभेत निवृत्तीचे संकेत

Girish Mahajan यांनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Girish Mahajan

BJP’s ‘crisis-solver’ Girish Mahajan hints at retirement during a public rally : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सात वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आता पुढील काळात नव्या नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आली असल्याचे संकेत त्यांनी दिले.

MHT-CET Scam : 12 वीला 40 टक्के अन् CET परिक्षेत 99 पर्सेंटाईल कसे…MHT-CET परीक्षेतही घोटाळा?

चाळीसगाव येथे विविध शासकीय कार्यालयांच्या उद्घाटनासह विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले. याचवेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे भविष्यात जळगाव जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

15 परीक्षांचे पेपर फुटले…भाजप सरकार आल्यापासून… एमपीएससी पेपरफुटीबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप

महाजन म्हणाले की, भाजपने पहिल्यांदा मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांची राजकीय ओळख मर्यादित होती. मात्र, आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकासकामांना दिलेला वेग उल्लेखनीय आहे. त्यांच्या कामामुळे पक्षालाही समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

3 महिन्यांत 21 हजारांवरून थेट टॉप 100 मध्ये! MPSC च्या निकालाने खळबळ, मेहबूब शेख यांचे गंभीर आरोप

यावेळी त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. सात कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कायम पदावर राहण्यापेक्षा पुढील पिढीला संधी मिळणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पक्षाची धुरा सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्वाकडे सोपवली पाहिजे, असे सांगत त्यांनी मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास व्यक्त केला.

विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका

भाषणादरम्यान गिरीश महाजन यांनी कोणाचेही नाव न घेता काही राजकीय नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. राजकारणात प्रत्येकाने योग्य वेळी थांबण्याची मानसिकता ठेवली पाहिजे, असे सांगताना काही जण प्रत्येक ठिकाणी स्वतःलाच केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करतात, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्याचा रोख ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या दिशेने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

‘गंभीर अटी घाला पण तुरुंगातून बाहेर काढा’; नगरसेवक रमेश म्हात्रेला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका!

जळगाव जिल्ह्यात भाजपच्या राजकारणात गिरीश महाजन यांचे मोठे वर्चस्व मानले जाते. अशा परिस्थितीत त्यांनी सार्वजनिक मंचावरून मंगेश चव्हाण यांना भविष्यातील नेतृत्व म्हणून पुढे केले असल्याने जिल्ह्यातील भाजपच्या आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चांना वेग आला आहे. महाजन यांच्या वक्तव्यामुळे पुढील काळात पक्षातील नेतृत्वाची दिशा काय असेल, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

 

follow us