‘गंभीर अटी घाला पण तुरुंगातून बाहेर काढा’; नगरसेवक रमेश म्हात्रेला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका!
डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला असून ताशेरे ओढले आहेत.
Ramesh Mhatre : शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी हायकोर्टात जामिनासाठी गयावया केली असल्याची माहिती समोर आलीयं. माझ्यावर गंभीर अटी घाला पण तुरुंगातून बाहेर काढा, अशी गयावया म्हात्रे यांनी केली आहे. परंतू न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन मंजूर करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे म्हात्रे यांचा न्यायालयीन कोठडीत आणखीन मुक्काम वाढला आहे.
राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाविरोधात शेतकरी एकवटले; आमदार तनपुरे करणार कृती समितीचं नेतृत्व
हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी गयावया केली असून तपास पूर्ण होईपर्यंत जिल्हा काय राज्याबाहेरही जाईल. हायकोर्टात सुनावणीवेळी तुरुंगातून सोडा, अशी म्हात्रेने विनंती केलीयं. माझ्यावर गंभीर अटी घाला परंतू तुरुंगातून सोडा, अशीही मागणी रमेश म्हात्रे यांनी न्यायालयाकडे केली आहे. परंतू या सुनावणीदरम्यान न्यायालयानेच ताशेरे ओढले आहेत. सेवेच्या नावावर मते मागता जिंकल्यानंतर मतदारांनाच मारता, या शब्दांत ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत.
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या गुंड रमेश म्हात्रेने आता पवित्रा बदलल्याचं दिसून येत आहे. मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जामीन मिळवण्यासाठी रमेश म्हात्रेचे प्रयत्न सुरु आहेत. वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेला तत्काळ जमीन देण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा नकार दिला आहे. रमेश म्हात्रेला शुक्रवारपर्यंत जामीन मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
माळशेज घाटात रस्ता खचला, मुंबईकडं जाणारी सर्व वाहतूक बंद; नागरिकांना पर्यायी मार्ग कोणते?
या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त (डीसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आधी डॉक्टरांना मारहाण करायची आणि मग प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागण्याच्या रमेश म्हात्रेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तुम्ही मतदारांकडे जाता आम्हाला तुमची सेवा करायची आहे, म्हणून मत मागता आणि निवडून आल्यावर मारहाण करता असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेला कानपिचक्या दिल्या आहेत. लोक तुम्हाला मते देऊन निवडून आणतात आणि निवडून आल्यावर फाईल आणि खुर्च्यांनी त्यांची डोकी फोडता, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने असं वागायचं का? असाही सवाल न्यायालयाने सुनावणीदरम्यान केला आहे.
दरम्यान, , नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर तणाव वाढला होता. एका महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा या चौघांवर आरोप आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक केली.