उन्हाचा वाढता पारा…दिवसेंदिवस धरणं कोरडी, मंत्री विखेंनी दिल्या गोदावरीतून आवर्तन सोडण्याच्या सुचना

उन्हाचा वाढता पारा…दिवसेंदिवस धरणं कोरडी, मंत्री विखेंनी दिल्या गोदावरीतून आवर्तन सोडण्याच्या सुचना

Vikhe Patil on Godavari benefit area : गोदावरी लाभक्षेत्राकरीता डाव्‍या आणि उजव्‍या कालव्‍यातून सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन उद्या बुधवार (दि ३० एप्रिल) रोजी पासून सोडण्‍याच्‍या सुचना जलसंपदा तथा (Vikhe Patil) पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी विभागाच्‍या आधिकाऱ्यांना दिल्‍या आहेत.

या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्‍या आधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन, लाभक्षेत्रात पाण्‍याची असलेली वाढती मागणी तसंच उन्‍हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून शेतीच्‍या पाण्‍याबरोबरच पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी आवर्तनाचे नियोजन करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या आहेत. त्‍यानुसार जलसंपदा विभागाने उद्या सिंचन व बिगर सिंचनाचं एकत्रित आवर्तन सोडण्‍याचं नियोजन केलं आहे.

Video: विखे पाटील मला सांगायचे संग्राम;; भाजपात दाखल होताच थोपटेंनी काँग्रेसवर फोडलं खापर

लाभक्षेत्रातील शेतक-यांची मागणी आणि उन्‍हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून आवर्तन सोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले. या आवर्तनाचा लाभ रब्‍बी पिकांना होणार असून, या बरोबरीने ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी होणार आहे. उन्‍हाची तिव्रता वाढल्‍याने काही गावांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍याही निर्माण झाली आहे.

या आवर्तनाचा या गावांनाही लाभ व्‍हावा या उद्देशाने सिंचन आणि बिगर सिंचन असे एकत्रित आवर्तन सोडण्‍याच्‍या सुचना मंत्री विखे पाटील यांनी विभागाला दिल्‍या आहे. उन्‍हाची वाढती तिव्रता लक्षात घेवून पाण्‍याचा अपव्‍यय होणार नाही याची दक्षता जलसंपदा विभागाच्या आधिका-यांनी घ्‍यावी, तसेच शेतक-यांनीही पाण्‍याचा योग्‍य विनीयोग करावा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube