Video: विखे पाटील मला सांगायचे संग्राम…; भाजपात दाखल होताच थोपटेंनी काँग्रेसवर फोडलं खापर

Congress leader Sangram Thopte Join BJP : काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संग्राम थोपटे (Thopte) यांनी अखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी नुकताच काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिकाही स्पष्ट केली होती. त्यानंतर त्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंच्या मनात राज ठाकरेंविषयी कोणताही.. एकत्र येण्याबाबत राऊतांनी दिली आतली बातमी
संग्राम थोपटे यांच्या प्रवेशावेळी अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केलं. प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात संग्राम थोपटे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. दरम्यान, थोपटे यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावं लागतं, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करणारं पत्र लिहिलं आहे.
काय म्हणाले संग्राम थोपटे?
मागच्या चार दिवसांपासून संग्राम थोपटे काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मी दोन दिवसांपूर्वी माझी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर सगळ्या चर्चांवर पडदा पडला. मला अनेकांनी विचारलं काँग्रेस का सोडत आहात? वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली आणि वाढवली मग तो पक्ष का सोडता? ही वेळ माझ्यावर काँग्रेसनेच आणली. माझ्यावर अन्याय होत होता हे पाच ते सात वर्षांपासून सगळेच पाहात होते. मला अनेकांनी निर्णय घे असं सांगितलं होतं पण मी सहजासहजी निर्णयापर्यंत पोहचत नव्हतो. मी पक्षाशी निष्ठा ठेवली. मात्र, निष्ठेचं काहीही फळ मला मिळालं नाही. असं संग्राम थोपटेंनी म्हटलं आहे.
बावनकुळे यांनी काय म्हणाले?
गेले काही दिवस संग्राम थोपटे येण्याची चर्चा होती, त्याप्रमाणे आज तो प्रवेश झाला आहे. चर्चा सुरु होती की संग्राम येतो की नाही? मात्र, संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश झाला आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये भूकंप आल्यासारखी स्थिती आहे. विदर्भातले नेते रोज विचारत होते की संग्राम येतो आहे का? मी त्यांना सांगितलं की संग्रामने संग्राम जिंकला आहे. भाजपला आता थोपटेंच्या रुपाने एक हिरा मिळाला आहे.