मिस इंडिया अमृता पत्की दिसणार ‘या’ मराठी चित्रपटात

मिस इंडिया अमृता पत्की दिसणार ‘या’ मराठी चित्रपटात

मुंबई : २००६च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेमध्ये यशस्वी झालेली अभिनेत्री अमृता पत्की आता बऱ्याच कालावधीनंतर ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. २०१० मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. आता पुन्हा आता ती ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठीत आली आहे.

या चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. ‘रापचिक रापचिक कोळीणबाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात अमृताच्या नखरेल अदा पहायला मिळणार आहे. २००६च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’ चा किताब मिळवला होता.

नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. संतोष दरेकर, मंगेश ठाणगे, देव चौहान यांनी लिहिलेल्या गाण्याला देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. ममता शर्मा आणि देव चौहान यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सच्या ‘सुर्या’ हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट ६ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. हसनैन हैद्राबादवाला यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

‘सुर्या’ चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. साहसदृश्ये अब्बास अली मोघल आणि मोझेस फर्नांडिस यांची आहेत. रेश्मा मंगेश ठाणगे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, प्रसाद मंगेश, चेतन मंगेश हे या चित्रटाचे सहनिर्माते आहेत. संग्राम शिर्के या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube