सावरकर ही भाजपची विचारसरणी पण ती… आमदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

सावरकर ही भाजपची विचारसरणी पण ती… आमदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर ही भाजपची विचारसरणी, ती काँग्रेसला मान्य नसल्याचं काँग्रेसच्या आमदार प्रणित शिंदे यांनी थेट पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून थेट भाजपच्या विचारसरणीवरच टीका केली जात आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरुन भाजपच्या नेत्यांनी गांधी यांच्यावर कारवाईचा एकच सूर धरला होता. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जातंय.

IPL 2023 : सलामीचा सामना गमावलेल्या संघाने जिंकलंय दोनदा जेतेपद; काय सांगतात आकडे

पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, प्रत्येक पक्षाची वेगवेगळी विचारसरणी असते अगदी तशीच भाजप आरएसएसची विचारसरणी आहे. सावरकर ही भाजपची विचारसरणी आहे. सावरकरांची विचारसरणी ही महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याविरोधात होती. आम्ही सर्वच विचारसरणींचा आदर करीत असून महाविकास आघाडी याविरोधात एकत्रितपणे लढून राज्याला एक स्थिर सरकार देणार असल्याचा निर्धार आमदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

रोहित पवारांना उच्च न्यायालयाचा दिलासा, मतदारसंघातील कामावरची स्थगिती उठवली

तसेच राज ठाकरे आणि भाजपची मिलीभगत आहे. हे आता सर्वांच्याच लक्षात येत आहे पण महाराष्ट्राची जनता हुशार असल्याचा मिश्किल टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना यावेळी लगावला आहे. राहुल गांधी यांच्या कारवाईविरोधात आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

देशात कोरोना वाढतोय, डब्ल्यूएचओनो सांगितलं कारण…

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जनतेची कामे झालेली नाहीत. सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीविरोधातील पद्धती वापरुन नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून राज्यात जातीयवाद निर्माण केला जात असून जिथं विकासकामे नाहीत तिथं धर्माचा आधार घेऊन निवडणूका लढविल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका धर्मनिरपेक्ष देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे सत्ताधारी नेते लोकशाही स्वीकारणाऱ्या जनतेमध्ये तेढ निर्माण करु नये, असं आवाहनही आमदार शिंदे यांनी यावेळी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube