महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर संताप! परिक्षा रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट ब, क सेवा संयुक्त परिक्षेचे प्रवेश पत्र टेलिग्रामवर व्हायरल झाल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरच मिळणारं प्रवेश पत्र टेलिग्रामवर व्हायरल झाले आहेत.
एवढंच नाहीतर आपल्याकडं प्रश्नपत्रिकाही असल्याचा दावा करण्यात येत असल्याचं उघड झालंय. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर लोकसेवा आयोगाच्या कारभारवर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र; अखेर गुन्हा दाखल
लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी वर्षभरापासून लाखो विद्यार्थ्यी अतोनात परिश्रम घेत असतात. लोकसेवेच्या परिक्षा पारदर्शक होत असल्याचा विश्वास राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना असल्याने विद्यार्थी परिक्षेची तयारी करत असतात. मात्र,अशावेळी लोकसेवा आयोगाकडे असलेली विद्यार्थ्यांची माहिती आणि प्रवेश पत्र व्हायरल करणाऱ्या व्यक्तीकडे जातंच कसं? असा सवालही त्यांनी केला आहे.
ईदच्या शुभेच्छा देणं गायक शानला पडलं महागात! चाहते म्हणाले, “तू मुसलमान कधीपासून…”
तसेच संबंधित परीक्षेची प्रश्नपत्रिका या व्यक्तीकडे खरंच आहे काय? ती त्याने कांही व्यक्तींसह विद्यार्थ्यांना दिलीय का? या व्यक्तीच्या दाव्यानंतर लगेच तासाभरात आयोगाने अशी कोणती शहानिशा, चौकशी केली की, ज्या आधारे आयोगाने नोटिफिकेशन काढून परीक्षा नियोजित वेळीच होईल आणि प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा निर्वाळा दिला? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना पडले आहेत.
दरम्यान, लोकसेवा आयोगाच्या परिक्षेशी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य निगडीत असल्याने येत्या 30 एप्रिलला होणारी ही परिक्षी तत्काळ रद्द करुन दुसऱ्या प्रश्नपत्रिका आयोगाकडून काढण्यात याव्यात, अशी मागणी संतप्त विद्यार्थ्यांकडून केली जात असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी स्पष्ट केलं आहे.