मोहरम मिरवणुकीत 14 हजार विषारी गोळ्या जप्त; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Police : मोहरमच्या मिरवणूकीत मुंबई पोलिसांनी शुक्रवार (26 जून) रोजी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला

Mumbai Police

Mumbai Police : मोहरमच्या मिरवणुकीत मुंबई पोलिसांनी शुक्रवार (26 जून) रोजी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला पेन किलरच्या नावाखाली विषारी घटक असलेल्या गोळ्या वाटप करत असताना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत 14,900 गोळ्या जप्त करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी सर्व अँगलने तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या भायखळ (Byculla) परिसरात मोहरमच्या मिरवणूकीत एका व्यक्तीला लोकांना टॅबलेट वाटत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या व्यक्तीने टॅबलेट वाटण्यासाठी परवानगी घेतली नसल्याने ताब्यात घेण्यात आले होते. घटनास्थळी एका व्यक्तीची या टॅबलेट खाल्ल्याने तब्येत खराब झाल्याची देखील माहितीसमोर आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या फैयाज प्रेमजी याची कसून चौकशी केली असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.

टॅबलेटमध्ये झिंक फॉस्फेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या फैयाज प्रेमजी (Faiyaz Premji) याच्याकडे ज्या गोळ्या सापडल्या त्यात एक ग्रॅम झिंक फॉस्फेट (Zinc Phosphide) आढळून आले आहे. झिंक फॉस्फेट एक विषारी घटक असल्याने पोलिसांनी 14,900 गोळ्या जप्त करत मोठा अनर्थ टाळला. माहितीनुसार, फैयाज प्रेमजी पुण्यातील पुणे (Pune) विमाननगर येथील रहिवाली असून पोलिसांनी त्याचे आधारकार्ड, पासपोर्ट जप्त करत पुढील कारवाई सुरु केली आहे. मोहरम मिरवणूकीतील लोकांना टार्गेट करण्यासाठी त्याने विषारी गोळ्या वाटल्याची कबूली दिली आहे.

युवांच्या भविष्याशी खेळ! गेल्या 5 वर्षांत देशात 9 मोठ्या परीक्षांचे पेपर लीक-

follow us