Paper Leaks Case : युवांच्या भविष्याशी खेळ! गेल्या 5 वर्षांत देशात 9 मोठ्या परीक्षांचे पेपर लीक
Paper Leaks Case : स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी पेपरफुटी हा एक अत्यंत चिंताजनक विषय बनला आहे.
Paper Leaks Case : स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी पेपरफुटी हा एक अत्यंत चिंताजनक विषय बनला आहे. गेल्या 5 वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली, तर देशातील तब्बल 9 मोठ्या आणि महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर लीक झाल्याचे समोर आले आहे. नुकतीच NEET परीक्षा पेपर फुटीमुळे पुन्हा परीक्षा घ्यावी लागली. नीट पेपर संदर्भात महाराष्ट्रातूनच मोठे रॉकेट समोर आले होते. त्यामध्ये अनेकांना सीबीआयने अटक केली. हे प्रकरण ताजे असतानाच आता टीईटीचा पेपर फुटल्यामुळे मोठा धक्का बसला आहे.
या 9 मोठ्या परीक्षांना बसला पेपरफुटीचा फटका:
1. नीट-युजी (NEET-UG) वैद्यकीय प्रवेश परीक्षा (मे 2026 ): लाखो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागले. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जणांना सीबीआयने अटक केली. परीक्षा पुन्हा घ्यावी लागली.
2. पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा (फेब्रुवारी 2024): खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांच्या मेहनतीवर यामुळे पाणी फेरले गेले होते.
3. यूपीपीएससी (UPPSC) आरओ/एआरओ परीक्षा (फेब्रुवारी 2024): उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या महत्त्वाच्या परीक्षेचा पेपरही लीक झाला होता.
4. यूजीसी-नेट (UGC-NET) परीक्षा (जून 2024): प्राध्यापक आणि संशोधक बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांची ही परीक्षा पेपरफुटीमुळे वादात सापडली.
5. उत्तराखंड पटवारी/लेखपाल भरती (फेब्रुवारी 2023): राज्य पातळीवरील या सरळसेवा भरतीलाही गैरप्रकाराचा फटका बसला होता.
6. बीपीएससी (BPSC) 67 वी संयुक्त स्पर्धा परीक्षा (मे 2022): बिहार लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा पेपर फुटल्याने खळबळजणक परिस्थिती निर्माण झाली होती.
7. गुजरात ज्युनियर क्लर्क भरती परीक्षा (डिसेंबर 2022): परीक्षेच्या ऐन वेळी पेपर लीक झाल्याचे समोर आल्याने परीक्षा रद्द करावी लागली होती.
8. राजस्थान REET शिक्षक भरती परीक्षा (सप्टेंबर 2021): शिक्षकांची भरती करणाऱ्या या मोठ्या परीक्षेमध्येही मोठा गैरप्रकार उघडकीस आला होता.
9. UPTET परीक्षा (डिसेंबर 2021): उत्तर प्रदेशातील शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याने लाखो उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला.
आता महाराष्ट्रात शिक्षक भरती परीक्षा टीईटीचा पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे परीक्षा पद्धतीतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल सुरक्षा असतानाही पेपर फुटीचे प्रकार नियमीत समोर येत आहेत.
राजकारणात पुन्हा ‘ऑपरेशन’ ? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली CM फडणवीसांची भेट